नागपुरात डेल्टा प्लसचा शिरकाव; 5 जणांना संसर्ग झाल्याचा अहवाल

महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानं दिलासा मिळाला होता. नागपूर शहरात कोरोनाच्या डेल्टा प्लस  वेरिएंटचा शिरकाव झाला असल्याचं समोर आलं आहे.

नागपुरात डेल्टा प्लसचा शिरकाव; 5  जणांना संसर्ग झाल्याचा अहवाल
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Aug 25, 2021 | 11:57 AM

नागपूर: महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानं दिलासा मिळाला होता. नागपूर शहरात कोरोनाच्या डेल्टा प्लस  वेरिएंटचा शिरकाव झाला असल्याचं समोर आलं आहे. शहरात पहिल्यांदाच डेल्टा प्लसच्या पाच रुग्णांची नोंद झाली आहे. तर, ज्या व्यक्तींना डेल्टा प्लसचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे, ते व्यक्ती कोरोनामुक्त झाले असल्याचं आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

डेल्टा प्लसचे रुग्ण कुठं आढळले?

नागपूर शहरातील धंतोली, हनुमान नगर आणि मंगळवारी परिसरात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण बरे झाल्याची मनपाच्या आरोग्य विभागानं माहिती दिली आहे. या सर्वांचे नमुने जुलै महिन्यात तपासणीसाठी पाठवले होते, असं देखील सांगण्यात आलं आहे. नागपूरमधील कोरोना विषाणू संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे. मात्र, डेल्टा प्लस वेरिएंटचे रुग्ण आढळल्यानं नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. नागरिकांनी मास्कचा वापर करावा, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

नागपूरकरांवर डेंग्यूचं नव संकट

नागपूरकरांवर आता नवं संकट उभं राहताना दिसत आहे. नागपूर शहरात आरोग्य विभागाला 9 हजार 800 पेक्षा जास्त घरांमध्ये डेंग्यूच्या आळ्या आढळल्या आहेत. त्यामुळे नागपूरकर कोरोना विषाणू संसर्गानंतर आता डेंग्यूला सामोरं जाव लागण्याची शक्यता आहे. नागपूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून शहरात डेंग्यूची भयावह स्थिती उघड झाली आहे. डेंग्यूच्या अळ्या आढळलेल्या घरांवर कारवाई होणार का? हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतं आहे. नागपूर महापालिकेनं 1 लाख 85 हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात आलं होतं. नागपूर शहरात जानेवारी ते आतापर्यंत 442 डेंग्यू रुग्णांची नोंद झाली आहे.

नागपूर महापालिका कोविडच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज

कोव्हिडच्या संभाव्य तिस-या लाटेमध्ये नागपूर महानगरपालिकेद्वारे सक्षमतेने कोरोनावर नियंत्रण आणता यावे व या कार्यामध्ये कुठलीही अडचण येऊ नये, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ नागपूरतर्फे मनपाला 17 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर व 8 बायपॅप मशीन भेट देण्यात आले.vनागपूर महानगरपालिकेतर्फे अतिरिक्त आयुक्त राम जोशी व माजी स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी ही भेट स्वीकारली.

इतर बातम्या:

दुसरा डोस मिळणं कठीण, नाशिकमध्ये कोरोना लसीच्या तुटवड्यानं ज्येष्ठ नागरिकांवरही भटकंतीची वेळ

कोरोना लसीकरणात महाराष्ट्राची घोडदौड, एकाच दिवसात 11 लाख नागरिकांना लस

Nagpur corona Update five person report came positive as infected by delta plus variant

Non Stop LIVE Update
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.