Corona Vaccination | नागपुरात पहिल्या दिवशी 44 डॉक्टरांची लसीकरणाकडे पाठ, कारण काय?

Covaxin: नागपूरमध्ये पहिल्या दिवशी 44 डॉक्टरांनी लसीकरणाकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे. (Nagpur Corona Vaccination)

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 15:03 PM, 19 Jan 2021
Corona Vaccination | नागपुरात पहिल्या दिवशी 44 डॉक्टरांची लसीकरणाकडे पाठ, कारण काय?
कोरोना लस

नागपूर: भारत सरकारनं दोन कोरोना प्रतिबंधक लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. सीरम इनस्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन या लसींचा त्यामध्ये समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरणाचा कार्यक्रम 16 जानेवारीला सुरु करण्यात आला. मात्र, नागपूरमधील डॉक्टरांनी पहिल्या दिवशी लसीकरणाकडं पाठ फिरवली असल्याचं दिसून आले आहे. नागपूरमध्ये पहिल्या दिवशी 53 डॉक्टर्सने लस घेतली तर 44 डॉक्टर्सनी लस घेतली नाही. ( Nagpur Corona vaccination forty four doctors not take covaxin)

लसीकरणाबाबत डॉक्टरांची भूमिका काय

नागपूरमधील काही डॉक्टरांनी ‘स्वदेशी कोवॅक्सिन कोरोना लस घेण्यास नकार दिला आहे. पहिल्या दिवशी नागपूर मेडीकलमध्ये 44 डॅाक्टर्स लस घेण्यास आले नाहीत. यापैकी काही डॅाक्टरांना लसीच्या परिणामकारकतेबाबत संभ्रम आहे. तर ,काही डॅाक्टर लसीच्या परिणामाची वाट पाहत आहेत, असं मेडीकल प्रशासनाकडून सांगण्यात येतंय.

कोरोना लसीकरण प्रमुखांचं मत काय?

मेडीकल लसीकरण टीमचे प्रमुख डॉ. उदय नार्लावार यांनी कोरोना लसीकरणाला डॉक्टरांनी लसीकरणाला गैरहजेरी लावण्यामागे कोवॅक्सिन लसीबाबत संभ्रम हे कारण असल्याचं सांगतिलं. नागपूरमध्ये कोवॅक्सिन लस उपलब्ध झाली आहे. पहिल्या दिवशी 56 लोक लसीकरणासाठी आली होती. त्यापैकी 3 लोकांना लस देता येत नव्हती. ज्या 53 जणांनी कोवॅक्सिन लस घेतली त्यांच्यावर कोणताही परिणाम दिसून आला नाही, असं डॉ. उदय नार्लावार म्हणाले.

दोन दिवसांनतर लसीकरण सुरु

कोरोना लसीकरणासाठी कोविन अ‌ॅप तयार करण्यात आले होते. त्या कोविन अ‌ॅपमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळे कोरोना लसीकरणाचा कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. आज पुन्हा कोरोना लसीकरणाला सुरुवात झालीय. 16 जानेवारीला देशभरात कोरोना लसीकरणाचा शुभारंभ झाला. पण, त्यानंतर रविवार आणि सोमवारी लसीकरण बंद होतं. आजपासून राज्यभरात लसीकरणाला पुन्हा सुरुवात झालीय. नागपूर जिल्ह्यात 12 केंद्रांवर पुन्हा एकदा लसीकरण सुरु झालंय.

संबंधित बातम्या:

कोविन अ‌ॅपमध्ये तांत्रिक अडचणीमुळे लसीकरणाला स्थगिती, गैरसमज पसरवू नका, किशोरी पेडणेकरांचे आवाहन

Covaxin लसीचे दुष्परिणाम आढळल्यास भरपाई, भारत बायोटेकची मोठी घोषणा

मोठी बातमी : कोविन ॲपमधील तांत्रिक दोषामुळे कोरोना लसीकरण 2 दिवस बंद

( Nagpur Corona vaccination forty four doctors not take covaxin)