हैदराबादमध्ये सिंहांना कोरोना, नागपूरमध्ये अलर्ट; प्राण्यांना वाचवण्यासाठी विशेष कोरोना प्रतिबंधक नियमावली

नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांचे कोरोनापासून रक्षण व्हावे म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमावली तयार करण्यात आली आहे. (nagpur maharaja baag zoo corona virus)

हैदराबादमध्ये सिंहांना कोरोना, नागपूरमध्ये अलर्ट; प्राण्यांना वाचवण्यासाठी विशेष कोरोना प्रतिबंधक नियमावली
NAGPUR ZOO CORONA
Follow us
| Updated on: May 06, 2021 | 6:31 PM

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सर्वत्र हाहा:कार उडाला आहे. राज्यात रोज हजारो रुग्ण आढळत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत फक्त माणसेच नव्हे तर प्राण्यांनासुद्धा कोरोनासदृश लक्षणे दिसत आहेत. हैदराबाद येथील तब्बल 8 सिंहाना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी आले होते. याच कारणामुळे आता राज्यातील विविध प्राणी संग्रहालयांमध्ये खबरदारी घेण्यात येत आहे. नागपूरच्या महाराज बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांचे रक्षण व्हावे म्हणून कोरोना प्रतिबंधक नियमावली तयार करण्यात आली आहे. (Nagpur Maharaja Baag zoo administration taking special care of all animals to protect from Corona virus)

प्राण्यांच्या काळजीसाठी खास नियमावली

नागपूर येथील महाराज बाग प्राणी संग्रहालयात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. वाघ, अस्वल, बिबट, हरीण असे प्राणी पाहण्यासाठी येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. मात्र, कोरोनामुळे हे प्राणी संग्रहालय सध्या बंद आहे. असे असले तरी प्राण्यांनासुद्धा कोरोना होऊ शकतो हे समोर आल्यानंतर येथील प्रशासन प्राण्यांची विशेष काळजी घेत आहे. त्यासाठी येथे खास नियमावली तयार करण्यात आली असून त्यानुसार प्राण्यांची देखरेख केली जात आहे.

प्राण्यांची अशा प्रकारे घेतली जाते काळजी

महाराज बाग प्राणी संग्रहालयात प्राण्यांची काळजी घेण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर केलेली असणे प्रशासनाने बंधनकारक केले आहे. तसेच प्राण्यांना कोणतेही अन्न देण्यापूर्वी ते गरम पाण्यात उकळण्यात येत आहे. प्राणी संग्रहालयात सामान्यांना येण्यास बंदी घालण्यात आलीये. कर्मचाऱ्यांव्यतीरिक्त अन्य व्यक्तींना येथे प्रवेश नाही. तसेच येथील प्राण्यांमध्ये कोरोनासदृश लक्षणं आढळून आल्यास त्यांची तपासणी केली जाणार आहे.

कोणत्याही प्राण्याला कोरोनसदृश लक्षण नाही

दरम्यान, नागपूर येथील महाराज बाग प्राणी संग्रहालय शहराच्या मध्यभागी आहे. या संग्रहालयात मोठ्या प्रमाणात प्राणी आहेत. या प्राण्यांना कोरोनापासून वाचवण्यासाठी येथील प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या येथे कोणत्याही प्राण्याला कोरोनासदृश लक्षणं नाहीत.

इतर बातम्या :

महपौर म्हणतात आता तरी बोध घ्या, भाजप म्हणतं अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका, कोर्टाच्या कौतुकाने शिवसेना-भाजप आमनेसामने

लय भारी! गडकरींनी वर्ध्यातील कंपनीला मिळवून दिला रेमडेसिव्हीरच्या उत्पादनाचा परवाना

Maharashtra Oxygen Shortage : कर्नाटक सरकारने सांगली, कोल्हापूरचा ऑक्सिजन रोखला!, केंद्राकडे हस्तक्षेपाची मागणी

(Nagpur Maharaja Baag zoo administration taking special care of all animals to protect from Corona virus)

Non Stop LIVE Update
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.