धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने आपल्याकडे बघावं, सुनील केदार यांनी भाजपला सुनावलं

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने आपल्याकडे बघावं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे.

  • गजानन उमाटे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 12:11 PM, 15 Jan 2021
धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने आपल्याकडे बघावं, सुनील केदार यांनी भाजपला सुनावलं

नागपूर : राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री सुनील केदार (Minister Sunil Kedar On Dhananjay Munde Case) यांनी नागपुरातील पाटणसावंगी गावात मतदान केलं. पाटणसावंगीतील जिल्हा परिषद शाळेत त्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गायिका रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपांवर त्यांची भूमिका मांडली. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने आपल्याकडे बघावं, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे (Minister Sunil Kedar On Dhananjay Munde Case).

सुनील केदार काय म्हणाले?

“धनजंय मुंडे यांच्याबाबत चौकशी सुरु आहे. धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागताना भाजपने आपल्याकडे बघावं. भाजप आमदार राम कदम यांनी दांडीयाच्या वेळेस केलेले वक्तव्य बघावं. धनंजय मुंडे यांच्याबाबत पोलीस चौकशी करतायत”, असं म्हणत सुनील केदार यांनी भाजपला खडे बोल सुनावले.

राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंना दिलासा

राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या (NCP) नेतृत्त्वाकडून तूर्तास धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. शर्मा यांनी पोलिसांकडे जाऊन रीतसर तक्रारही नोंदवली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले होते. रेणू शर्मा यांनी आपल्याला हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप हेगडे यांनी केला होता.

त्यानंतर रेणू शर्मा यांनी आणखी काही लोकांना अशाचप्रकारे ब्लॅकमेल केल्याच्या घटना समोर आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या सगळ्याची माहिती घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबायचा निर्णय घेतला आहे. परिणामी तूर्तास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.

Minister Sunil Kedar On Dhananjay Munde Case

संबंधित बातम्या :

हे सगळं शरद पवारांचं नाटक; ती महिला कशीही असू दे, पण धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलाच पाहिजे: सोमय्या

Dhananjay Munde case | शरद पवारांचा सूचक इशारा, तरीही धनंजय मुंडेना राष्ट्रवादीकडून अभय?

Dhananjay Munde Case | धनंजय मुंडेंचा छळ झाला, ते त्रासात होते : जयंत पाटील

Dhananjay Munde Case | माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता: रोहित पवार

पोलिसांच्या तपासानंतर धनंजय मुंडेंसमोर कायदेशीर पर्याय कोणते?