NHAI तर्फे देशात 100 ठिकाणी वृक्षारोपण, नागपुरात नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन, जितकी लोकं तितकी झाडं लावा

50 लाख रुपये नर्सरीसाठी दिले. त्यातून फ्लॉवर गार्डन बनविला जाईल. त्यात जगातील सगळे फूल असतील.

NHAI तर्फे देशात 100 ठिकाणी वृक्षारोपण, नागपुरात नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटन, जितकी लोकं तितकी झाडं लावा
नागपुरात नितीन गडकरींच्या हस्ते उद्घाटनImage Credit source: facebook
Follow us
| Updated on: Jul 17, 2022 | 4:53 PM

नागपूर : आझादी का अमृत मोहत्सव निमित्ताने NHAI नं 100 ठिकाणी वृक्षारोपण केलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थिती कार्यक्रमाचे उद्घाटन नागपुरात झालं. यावेळी गडकरी म्हणाले, नागपुरात ऍग्रो कन्व्हेंशन सेंटर (Agro Convention Centre) बनविला जाणार आहे. एलआयटीला वर्ल्ड क्लास रिसर्च सेंटर (World Class Research Centre) बनवावं, अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. गडकरी म्हणाले, माझं एक स्वप्न आहे जितकी लोकसंख्या आहे तितकी झाड लावायचं. नागपूरला तिन्ही प्रदूषणातून मुक्त करायचा आहे. त्यासाठी सगळ्याच सहकार्य आवश्यक आहे. मी पाच वर्षात पेट्रोल, डिझल समाप्त करण्याच्या विचारात आहे. त्यासाठी इलेक्ट्रिक गाड्या (Electric Cars) सुद्धा मार्केटमध्ये आल्या आहेत. नद्या, नाले साफ करून आणि प्लास्टिकपासून शहराला मुक्त करूया, असा संकल्प गडकरी यांनी यावेळी केला.

पाहा व्हिडीओ

शेणापासून ऑईल पेंट

नितीन गडकरी म्हणाले, विदर्भातील प्रत्येक गाय 20 ते 25 लिटर दूध देणारी निर्माण करायचं आहे. जिल्ह्यात गोरी (गायचे पिल्लू ) बचाव अभियान सुरू केलं आहे. शेणा( गोबर)पासून ऑइल पेंट बनविण्याचा काम सुरू केलं. हे सर्व पर्यावरणाच्या दृष्टीने जागृती आवश्यक आहे. 50 लाख रुपये नर्सरीसाठी दिले. त्यातून फ्लॉवर गार्डन बनविला जाईल. त्यात जगातील सगळे फूल असतील.

हे सुद्धा वाचा

सर्वाधिक झाडं लावणाऱ्या शहराला अवॉर्ड

कुठंलंही काम करायचं झालं की साधारणतः झाड कापण्याचं काम केलं जातं. मात्र त्यात आम्ही आता बदल केला. कामाच्या ठिकाणी झाड कापण्याची गरज असेल तर ते ना कापता ते ट्रान्सप्लांट करणार आहोत. एक झाड ट्रान्सप्लांट करायचं असेल तर आम्ही 5 झाड लावू. रोड बनत असतात मात्र त्यावर वाहन चालत असताना प्रदूषण होते. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्याच्या बाजूला झाडे लावण्याचा काम हाती घेतले. ज्या शहरात सगळ्यात जास्त झाडे लागतील त्या शहराला आम्ही अवॉर्ड देऊन प्रोत्साहन देणार असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं. ते आज एनएचआयुएतर्फे देशभरात शंभर ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रम उद्घाटनाप्रसंगी नागपुरात बोलत होते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.