विमा क्षेत्रात 74 टक्के FDI ला केंद्राची परवानगी, संघ परिवारातील कामगार संघटनांची आंदोलनाची तयारी?

संघ विचारांच्या कामगार संघटनांकडून विरोध करुनही केंद्रानं विमा क्षेत्रात 74 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. ( RSS ideology followers worker union )

विमा क्षेत्रात 74 टक्के FDI ला केंद्राची परवानगी, संघ परिवारातील कामगार संघटनांची आंदोलनाची तयारी?
विमा क्षेत्रात 74 टक्के परकीय गुंतवणुकीचा निर्णय
Follow us
| Updated on: Feb 04, 2021 | 3:49 PM

नागपूर: केंद्र सरकारने सादर केलेल्या बजेट मध्ये जीवन विमा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आलं आहे. मात्र, संघ परिवारातील कामगार संघटनांनी त्याला सुरुवातीपासून विरोध दर्शविला आहे. या विरोधाकडे दुर्लक्ष करीत केंद्र सरकारने 74 टक्क्यांवर परदेशी गुंतवणुकीचा निर्णय घेतला. यावर परिवारातील संघटनांनी पुन्हा एकदा नाराजी व्यक्त केली आहे. (RSS ideology followers workers union oppose fdi in insurance sector)

विमा क्षेत्राचा विचार करता भारतात 23 कंपन्या आहेत. यामध्ये विदेशी गुंतवणुकीला 2000 पासून सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात 26 टक्के एफडीआयची तरतूद करण्यात आली. 2014-15 मध्ये वाढ करीत 49टक्क्यांवर एफडीआय नेण्यात आल. मात्र, यावर्षी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर झालेल्या अर्थसंकल्पात पुन्हा एकदा वाढ करीत 74 टक्के एफडीआयची तरतूद करण्यात आली आहे. याचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार असल्याची भीती आहे. FDI एक टक्के वाढला तर LIC प्रायव्हेट होण्याची शक्यता विमा क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.भारतीय मजदूर संघ, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ इन्शुरन्स वर्कर्स या विमा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या संघटनेने परकीय गुंतवणुकीच्या निर्णयाला विरोध व्यक्त केला आहे.

केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आंदोलन?

भारतीय मजदूर संघ आणि भाजप संघाच्या विचारप्रणालीवर चालतात. दोन्ही संघटना एकाच मार्गावर चालतील असं होत नाही. भारतीय मजदूर संघ कामगारांच्या हितासाठी विरोध करतो. मजदूर संघाच्यावतीनं नोव्हेंबरमध्ये आंदोलन करण्यात आल्यानंतर कायद्यामध्ये बदल करण्यात आला. केंद्र सरकारनं विमा क्षेत्रात 74 टक्के परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली असली तरी भारतीय मजदूर संघाचा भाजप म्हणून नाही तर सरकारचा निर्णय म्हणून विरोध असेल. स्टेट फेडरेशनमध्ये चर्चा करुन केंद्राच्या निर्णयाला कसा विरोध करायचा हे ठरवलं जाईल, असं मिलिंद बल्लाळ यांनी सांगितलं.

संघ विचार मानणाऱ्या कामगार संघटनांनी याआधी देखील परकीय गुंतवणुकीच्या निर्णयाला असाच विरोध केला होता. संघ परिवारातील संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतरही केंद्रानं हा निर्णय घेतल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करण्याची मागणी केली जात आहे. अन्यथा या विरोधात आंदोलन पुकारण्याचा इशारा देखील संघ परिवारातील संस्थांनी दिला असल्याने भविष्यात संघ विरोधात मोदी सरकार अस चित्र पाहायला मिळालं तर आश्चर्य वाटयाला नको.

संबंधित बातम्या:

LIC ची कॅन्सर कव्हर पॉलिसी काय आहे? तुम्हाला काय फायदा मिळणार?

LIC कडे सध्या 30 लाख कोटींपेक्षा जास्त रक्कम; आपल्या जमा रकमेचे सरकार काय करते?

(RSS ideology followers workers union oppose fdi in insurance sector)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.