Nagpur : … म्हणून आमची मनं जुळतात, राज ठाकरेंनी सांगितले नितीन गडकरी सोबत असलेले नाते

लेझर शो च्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे दर्शन घडवून दिले.

Nagpur : ... म्हणून आमची मनं जुळतात, राज ठाकरेंनी सांगितले नितीन गडकरी सोबत असलेले नाते
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 10:19 PM

नागपूर :  (Raj Thackeray) मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पाच दिवशीय (Vidarbha) विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटन आणि आगामी महापालिकेच्या अनुषंगाने त्यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. असे असले तरी दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत (Musical Fountain) म्युझिकल फांऊटन शो ला उपस्थित होते. राज ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे राजकारणापलिकडचे नाते आहे. त्यामुळेच अशा सार्वजनिक कार्यक्रमात ते अनेक वेळा एकत्र आले आहेत. तर आमच्या दोघांचेही विचार हे भव्यदिव्य असतात म्हणूनच आमची मनं जुळतात असे राज ठाकरे यांनी या कार्यक्रमात सांगितले. राजकारण विरहित असलेल्या लेजर शो चा आनंद दोन्ही नेत्यांनी घेतला.

लेझर शो च्या कार्यक्रमासाठी नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकत्र आले होते. त्यावेळी नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाचे दर्शन घडवून दिले. तर आगामी काळात हा म्युझिकल फांऊटन शो अधिक भव्यदिव्य होणार असल्याचे सांगितले.

राज ठाकरे हे राजकारणामधले कलाकार तर आहेतच. शिवाय त्यांना कलेची जाणीव असल्यानेच ते अशा कार्यक्रमाला हजेरी लावतात. नागपूरात दरवर्षी अशा म्युजिकल फांऊटने कार्यक्रम घेतले जाणार आहेत. आगामी वर्षात येथील पार्किंगपासून ते बसण्याच्या सोई-सुविधांवर लक्ष केंद्रीत केले जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.