इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेसाठी नागपूर मनपाचा संघ कोणता?, कोण असणार कर्णधार

युवावर्ग, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे. याकरिता नागरिकांनी https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/ या लिंकवर नावनोंदणी करावी असे आवाहन श्री जोशी यांनी केले.

इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेसाठी नागपूर मनपाचा संघ कोणता?, कोण असणार कर्णधार
ग्रीन व्हिजीलचे हे कर्णधार इंडियन स्वच्छता लीग स्पर्धेत
Follow us
| Updated on: Sep 15, 2022 | 6:50 PM

नागपूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वच्छ भारत अभियान राबविले जात आहे. केंद्र शासनाने देशपातळीवर ‘इंडियन स्वच्छता लीग’ स्पर्धेचे आयोजन केले आले आहे. ‘इंडियन स्वच्छता लीग’मध्ये ‘नागपूर निती’ या नावाने नागपूर महापालिका सहभागी होणार आहे. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत नागपुरात विविध उप्रक्रम राबविले जाणार आहेत. या संदर्भात नागपूर महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकारी आणि स्वयंसेवकांची बैठक पार पडली.

इंडियन स्वच्छता लीग

यावेळी अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्यासह झोनल अधिकारी व स्वयंसेवी संस्थाने पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते. या बैठकीत अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पहिल्या स्वच्छ भारत अभियानाला आठ व स्वच्छ भारत अभियान -2 ला एक वर्ष झाले आहे. त्यानुसार केंद्र शासनाने स्वच्छ अमृत महोत्सवानिमित्त इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेचे आयोजन केले आहे.

हे सुद्धा वाचा

स्पर्धेत 1800 शहर सहभागी

देशपातळीवर होणाऱ्या या स्पर्धेत अठराशेहुन अधिक शहर सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी नागपूर महापालिकेच्या संघाला नागपूर नीती असे नाव देण्यात आले आहे. ग्रीन व्हिजील संस्थेचे मेहुल कोसुरकर कर्णधार असणार आहे.

शनिवारी सकाळी सात वाजता रॅली

या स्पर्धे अंतर्गत नागपूर महापालिकेतर्फे 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता स्वच्छता रॅली काढली जाणार आहे. ही स्वच्छता रॅली अमरावती रोड स्थित विद्यापीठ चौकापासून ते अंबाझरी स्थित विवेकानंद स्मारक ते दीक्षाभूमी अशी असणार आहे. रॅली दरम्यान नागरिक आपल्या श्रमदानाने मार्ग स्वच्छ करीत चालतील.

या लिंकवर करावी नोंदणी

यासाठी युवावर्ग, सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी व्हावे. याकरिता नागरिकांनी https://innovateindia.mygov.in/swachhyouthrally/ या लिंकवर नावनोंदणी करावी असे आवाहन श्री जोशी यांनी केले.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.