झेडपी शिक्षकांवर राहणार वॉच, शैक्षणिक दर्जा सुधारणार?

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक येत नाही किंवा व्यवस्थित शिकवीत नाहीत, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात.

झेडपी शिक्षकांवर राहणार वॉच, शैक्षणिक दर्जा सुधारणार?
शिक्षण विभागाचा प्लॅन काय?
Follow us
| Updated on: Nov 09, 2022 | 3:38 PM

नागपूर : जिल्हा परिषदेच्या गावा-गावांमध्ये शाळा आहेत. दूरवर शाळा असल्याने सर्व शाळांवर लक्ष ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळं आता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून या शाळांवर नियंत्रण ठेवलं जाणार आहे. यासाठी सर्व शाळांमध्ये डिजिटल यंत्रणा लावली जाणार आहे. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावं यासाठी नागपूर जिल्हा परिषदेच्या खेडोपाडी शाळा आहेत. मात्र, सर्वच शाळांवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाला शक्य होत नाही. परिणामी अनेक शाळांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळत नाही. त्यामुळं जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातून या शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा लावली जाणार आहे.

प्रायोगिक तत्वावर 9 शाळांमध्ये ही यंत्रणा बसवली आहे. त्यानंतर हळूहळू सर्व शाळांमध्ये ही यंत्रणा बसवली जाईल. या माध्यमातून विद्यार्थी शाळेत येतात की नाही, शिक्षक वेळेत पोहचतात की नाही, विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार कसा मिळतो, शिक्षक कशा प्रकारे शिकवितात, यावर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता राकेश वाघमारे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक येत नाही किंवा व्यवस्थित शिकवीत नाहीत, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत नाही. या व्यवस्थेमुळे शिक्षकांवर वचक राहणार आहे. त्यामुळं शिक्षण व्यवस्था सुधारेल, अशी अपेक्षा आहे.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोनापूर्वी गळती लागली होती. कोरोनात बऱ्याच लोकांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यानं त्यांनी आपल्या पाल्यांना पुन्हा जिल्हा परिषद शाळेत टाकले. त्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली. आता ही संख्या टिकवण्याचं आव्हान शिक्षण विभागापुढं आहे. त्यांत काही शाळा डिजिटल केल्यानं याचा फायदा विद्यार्थ्यांना नक्कीच होणार आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.