पोलादपूरः पोलादपूर तालुक्यातील कुडपण येथे वऱ्हाडाचा टेम्पो खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात तीन जण ठार झालेत. ही घटना सायंकाळी 7.00 वाजताच्या दरम्यान घडल्याची प्राथमिक माहिती रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिलीय. या अपघातात 34 गंभीर जखमी झाले असून, 25 किरकोळ जखमी आहेत. या घटनेतील मृत आणि जखमींची नावे टीव्ही 9च्या हाती लागली आहेत. (Names Of 3 Dead And 43 Injured In Poladpur Accident to Tv9; Whole List)
1) तुकाराम दत्तात्रय झोरे ( वय ४०), कुभांरडे. महाड, रायगड.
2) हरिश्चद्रं भावेश हेगाडे (वय २२), तुळशी धनगर वाडी. ता. खेड, रत्नागिरी.
3) विठोबा भोगाजी झोरे (वय ६३), खवटी. रत्नागिरी.
रामचंद्र कुरेकर (वय 40), कोतवाल
उषा कुरेकर (वय 24), कोतवाल
सुमित तुकाराम गवळी (वय 27), कवटी
रामचंद्र गवळी (वय 62), कवटी
बाळाबाई खुरेकर (वय 40), परसुली
प्रकाश जोरे, कशेडी
आनंद आखाडे, कशेडी
प्रवीण पांडुरंग जोरे
यशवंत खुरेकर, (वय 45), कोतवाल
सुनील गोरे, खवटी
उज्ज्वला राजेश ढेबे, (वय 30)
सुनील झोरे
बाळू ढेबे
गंगाराम खवटी
मोहम्मद युनुस जोगवीलकर, शिरसवणे
लक्ष्ण बाबू केंडे, खवटी
समीर संजय झोरे, खवटी
कविता संतोष झोरे
कांता प्रकाश झोरे, रा. खवटी
तेजस लक्ष्मण खुरेकर रा. परसुली
रहीम इब्राहीम मुंडेकर, शिरसवणे
सलमान मुंडेकर
विवेक गावडे, वनवसी
दिपेश पवार, ताम्हाणी
पोलादपूर तालुक्यातील दुर्गम आणि शेवटचे टोक असल्याने कुडपण मार्गावर धनगरवाडी येथील वळणावर ट्रॅक सुमारे 200 फुटांपेक्षा जास्त खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. यामध्ये रत्नागिरीतील खेड तालुक्यातील खवटी धनगरवाडी येथील वऱ्हाड असल्याची प्राथमिक माहिती मिळालीय. ट्रक दरीत कोसळल्याने 2 वर्षांपूर्वी झालेल्या आंबेनळी घाटातील अपघाताची पुनरावृत्ती होते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत असल्याने अनेक ट्रेकर्स घटनास्थळी रवाना झालेत. शुक्रवारी सायंकाळी 7 च्या सुमारास कुडपण गावात लग्न कार्यासाठी आलेल्या वऱ्हाड मंडळींच्या गाडीला लग्नकार्य आटोपून खेड खवटी धनगरवाडीकडे परतताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी खोल दरीत कोसळली, या अपघाताची माहिती मिळताच मदत ग्रुप खेड, महाबळेश्वर टेकर्स, पोलादपूरसह महाड येथील टीम घटनास्थळी दाखल झाल्यात.
या ट्रॅकमध्ये 70 ते 80 पेक्षा जास्त जण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झालीय. यापैकी अनेक जण जखमी झाले आहेत, तर आतापर्यंत दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या वऱ्हाडाने संपूर्ण ट्रक भरलेला होता. घटनास्थळी पोलीस, ट्रेकर्स रवाना झाले आहेत. घटनास्थळी ग्रामस्थांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आलेय.
संबंधित बातम्या
आंबेनळी घाटात पुन्हा अपघात, 58 प्रवाशांसह बस कोसळली
रत्नागिरीत भीषण अपघात; खासगी बस 50 फूट खोल दरीत कोसळली
Names Of 3 Dead And 43 Injured In Poladpur Accident to Tv9; Whole List