इंद्र देव बदमाश आणि लालची होता, तसंच देवेंद्र आणि नरेंद्र याचंही आहे : नाना पटोले

नागपूर : प्रचारात कोण काय बोलेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी भाजपच्या उत्तर प्रदेशातील नेत्यांनी हनुमानाची जात काढली होती. आता काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार यांनी सरकारवर टीका करता-करता थेट देवालाच मध्ये आणलंय. इंद्र देव हा फार लालची आणि बदमाश होता, तसंच नरेंद्र आणि देवेंद्र यांचं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची …

Nana patole, इंद्र देव बदमाश आणि लालची होता, तसंच देवेंद्र आणि नरेंद्र याचंही आहे : नाना पटोले

नागपूर : प्रचारात कोण काय बोलेल याचा नेम नाही. काही दिवसांपूर्वी भाजपच्या उत्तर प्रदेशातील नेत्यांनी हनुमानाची जात काढली होती. आता काँग्रेसचे नागपूरचे उमेदवार यांनी सरकारवर टीका करता-करता थेट देवालाच मध्ये आणलंय. इंद्र देव हा फार लालची आणि बदमाश होता, तसंच नरेंद्र आणि देवेंद्र यांचं आहे, असं वक्तव्य त्यांनी केलंय. या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नागपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला संबोधित करताना नाना पटोलेंची जीभ घसरली. ते म्हणाले, “इंद्र देवाचा करिश्मा तुम्हाला माहित आहे… इंद्र देव फार बदमाश होता आणि फार लालचीही होता… मात्र त्याच्यावर संकट आलं तर तो मोठ्या देवाकडे धवायचा… इथे तर दोन्ही इंद्र आहेत… वरती नरेंद्र आणि खालती देवेंद्र… आता या दोन्ही इंद्राचा काय करायचं , यांना मारायचं की सोडायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे…”

नागपुरात दक्षिण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं. सुमारे पाच दिवसांपूर्वीची नाना पटोलेंचा हा व्हिडीओ नागपुरात आता व्हायरल होतोय.

पाहा, नाना पटोले नेमकं काय म्हणाले?

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *