गोदावरीला पुराचा धोका, अशोक चव्हाणांची तातडीची बैठक, 337 गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड मधील विष्णुपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडून 84 हजार 541 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

गोदावरीला पुराचा धोका, अशोक चव्हाणांची तातडीची बैठक, 337 गावांना सतर्कतेचा इशारा

नांदेड : गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे (Ashok Chavan Take Emergency meeting). त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरुन वाहत आहे. नांदेड मधील विष्णुपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडून 84 हजार 541 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पाणी वाढलं तर नांदेड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी संबंधित विभागाची तातडीने बैठक घेऊन आढावा घेतला (Ashok Chavan Take Emergency meeting).

नांदेड जिल्ह्यात नांदेड शहरासह मुदखेड, धर्माबाद या तालुक्यातून गोदावरी नदी वाहाते. शिवाय, बिलोली आणि नायगाव तालुक्यातील काही गाव प्रभावित होऊ शकतात. गोदावरी नदीकाठच्या जवळपास 337 गावांना अशोक चव्हाण यांच्या सुचनेनुसार सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आपात्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नदीकाठी तसेच शहरातील नदी घाटावर जीवरक्षक दल तैनात करण्यात आले आहे. सध्या जायकवाडी, माजलगाव, मासोळी मध्यम प्रकल्प आणि सिद्धेश्वर या धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरु आहे.

रात्रीपर्यंत हा विसर्ग 1 लाख 48 हजार क्युसेकपर्यंत वाढेल. तितक्याच वेगाने विष्णुपुरीतून विसर्ग केला जाईल. पण, पुढे तेलंगणा राज्यातील पोचमपाड धरण देखील 100 % भरले आहेत. त्यातूनही विसर्ग सुरु आहे. पोचमपाडच्या बॅकवॉटरचा सर्वाधिक धोका नांदेड जिल्ह्याला बसणार आहे. सध्या तरी नांदेडमध्ये परिस्थिती नियंत्रनात आहे. पण गोदावरीत विसर्ग वाढला आणि मोठा पाऊस झाला, तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी वर्तवली आहे.

Ashok Chavan Take Emergency meeting

संबंधित बातम्या :

जायकवाडी धरणातून 50 हजार क्यूसेक पेक्षाही अधिकचा विसर्ग, गोदाकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *