नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा, अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. | Nanded to Mumbai Flight

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा, अशोक चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 7:54 AM

नांदेड : नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा आता दररोज उपलब्ध होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी ही विमानसेवा सुरु व्हावी म्हणून भरपूर प्रयत्न केले होते. अखेर चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. (Nanded to Mumbai Ahmedabad jalgaon daily flight, Minister Ashok Chavan efforts)

नांदेबरोबरच जळगाव आणि अहमदाबादला ये-जा करण्यासाठी नव्याने विमानसेवा सुरू होणार आहे. नांदेड ते मुंबई विमान सेवा आठवड्यातून चारच दिवस होती, मात्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी पुढाकार घेऊन ही विमानसेवा दररोज उपलब्ध करून दिलीय.

या जिल्ह्यांना विमानसेवेचा फायदा

नांदेड ते मुंबई दररोज विमानसेवा सुरु झाल्याने नांदेडसह शेजारच्या हिंगोली, परभणी, यवतमाळ आणि लातूर जिल्ह्यातील प्रवाश्यांना या सेवेचा भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

या अगोदर टू जेटची आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा सुरु होती. ही विमानसेवा तूर्तास तशीच राहणार असून बाकी राहिलेल्या चार दिवसांत टु जेटचे विमान सकाळी पावणे दहा वाजता अहमदाबादवरुन निघेल. ते विमान अकरा वाजता जळगावला पोहोचेल आणि साडे अकरा वाजता तेच विमान जळगाववरुन निघून पावणे एक वाजता मुंबईत पोहोचेल.

विमानाचं टाईमटेबल…

मुंबईतून 1 वाजून 25 मिनिटांनी निघणारं विमान नांदेडमध्ये तीन वाजता येईल. साडे तीन वाजता हे विमान परत एकदा मुंबईच्या दिशेने प्रयाण करेल तेच विमान मुंबई विमानतळावरुन पोहोचून साडे पाच वाजता जळगावच्या दिशेने प्रयाण करेल. त्यानंतर 7 वाजून 5 मिनिटांनी जळगाववरुन निघून रात्री 8 वाजून 25 मिनिटांनी हे विमान अहमदाबादला पोहोचेल.

नांदेडकरांनी मानले अशोक चव्हाण यांचे आभार

नव्याने सुरु होणाऱ्या विमानसेवेने दररोज मुंबईला जाण्यासाठी नागरिकांना आता आठ ते दहा तासांचा प्रवास करावा लागणार नाही. जर मुंबईत कोणतंही शासकीय काम असेल वा खासगी काम असे तर अगदी दोन तासांत नांदेडवरुन व्यक्ती मुंबईत येऊ शकतात. पाकलमंत्री अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने सुरु झालेली विमानसेवेने नागरिक सुखावले आहे. समस्त नांदेडकरांनी चव्हाण यांचे आभार मानले आहेत.

(Nanded to Mumbai Ahmedabad jalgaon daily flight, Minister Ashok Chavan efforts)

हे ही वाचा :

महाराष्ट्राचे मन खंबीर, इरादे पक्के, पुद्दुचेरीचे खेळ महाराष्ट्राच्या मातीत चालणार नाही, सामनातून टीका

इंधनावरील कर कमी करा, RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांचा सरकारला सल्ला

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.