नारायण दत्त तिवारी, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी आणि आता धनंजय मुंडे

विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या या फेसबुक पोस्टनं काही राजकीय नेत्यांच्या लग्नाच्या गोष्टीही चर्चेत आल्यात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:59 PM, 12 Jan 2021
Narayan Dutt Tiwari

मुंबईः राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या (Dhananjay Munde) फेसबुक पोस्टनं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालीय. धनंजय मुंडेंच्या फेसबुक पोस्टमुळे नव्याच वादाला फोडणी मिळालीय. विशेष म्हणजे धनंजय मुंडेंच्या या फेसबुक पोस्टनं काही राजकीय नेत्यांच्या लग्नाच्या गोष्टीही चर्चेत आल्यात. कर्नाटकातील जनता दल (सेक्युलर) पक्षाचे नेते कुमारस्वामीसुद्धा आपल्या लग्नाच्या प्रकरणामुळे चर्चेत आले होते. तर काँग्रेसचे नेते नारायण दत्त तिवारीसुद्धा 88व्या वर्षी विवाहबंधनात अडकले होते. (Narayan Dutt Tiwari, HD Kumaraswamy And Now Dhananjay Munde)

अभिनेत्री राधिकाबरोबर कुमारस्वामीचं छुपं लग्न
गेल्या काही वर्षांपूर्वी जेव्हा अभिनेत्री राधिकाबरोबर कुमारस्वामींनी छुपं लग्न केलं होतं, तेव्हा ती बातमी फारच चर्चेत आली होती. त्यावेळी कर्नाटक आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील राजकारणासाठी हा सर्वांत स्फोटक विषय होता. 2016 मध्ये कन्नड अभिनेत्री राधिकाशी कुमारस्वामींनी लग्न केले होते. कुमारस्वामी आणि राधिका दोघांचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी कुमारस्वामीने 1986 मध्ये अनिताशी लग्न केले होते. कुमारस्वामींना अनितापासून एक मुलगा देखील आहे, त्याचे नाव निखिल गौडा आहे. त्याचवेळी राधिकाने त्यांच्याशी दुसरे लग्नही केले. कुमारस्वामीने 2006 मध्ये राधिकाशी लग्न केले. या दोघांनाही एक मुलगी असून, तिचं नाव शमिका कुमारस्वामी आहे. कुमारस्वामी यांनाही राधिकाबरोबरच्या आपल्या लग्नाबद्दल कायदेशीर वादाचा सामना करावा लागला. हिंदू वैयक्तिक कायद्यांतर्गत कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत कर्नाटक उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली गेली होती. मात्र, पुरावा नसल्यामुळे हायकोर्टाने हे प्रकरण फेटाळून लावले.

…जेव्हा नारायण दत्त तिवारी वयाच्या 88 व्या वर्षी लग्न करतात

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि आंध्र प्रदेशचे माजी राज्यपाल नारायण दत्त तिवारी यांनीसुद्धा वयाच्या 88 व्या वर्षी हिंदू रितीरिवाजानं लग्न केलं होतं. जेव्हा तिवारी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी उज्ज्वला तिवारीशी लग्न केले, तेव्हा ते पुन्हा एकदा चर्चेत आले.
माजी मुख्यमंत्री नारायण दत्त तिवारी यांनी वयाच्या 88 व्या वर्षी 2014 मध्ये उज्ज्वला शर्माशी लग्न केले. यापूर्वी उज्ज्वला शर्मा यांचा मुलगा रोहित शेखर यांनी एनडी तिवारी यांना आपले वडील असल्याचं सिद्ध करण्यासाठी दीर्घ कायदेशीर लढाई लढावी लागली. रोहित शेखर यांच्यासाठी तिवारी यांनी डीएनए चाचणी केली होती, त्यानंतर रोहित शेखर एनडी तिवारी यांचेच पुत्र असल्याची खातरजमा झाली. तिवारी यांनी नंतर रोहित शेखर आणि त्याची आई उज्ज्वला शर्मा यांच्याशी असलेल्या संबंधांची कबुली दिली, त्यानंतर उज्ज्वला आणि एनडी तिवारी यांनी 14 मे 2014 रोजी लग्न केले. एन.डी. तिवारी यांचे सुशिला सावल यांच्याशी 1954 मध्ये उज्ज्वला शर्माच्या आधी लग्न झाले होते.

संबंधित बातम्या

करुणा शर्मापासून दोन मुलं, धनंजय मुंडे यांच्या पोस्टमधील 8 मोठे गौप्यस्फोट

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

Narayan Dutt Tiwari, HD Kumaraswamy And Now Dhananjay Munde