मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार? दुपारी 4 वाजता राणेंची पत्रकार परिषद

दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अभिनेत्री कंगना रानौतवर शरसंधान साधलं. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला नारायण राणे आज प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. दुपारी 4 वाजता राणे पत्रकार परिषद घेणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या टीकेला नारायण राणे काय प्रत्युत्तर देणार? दुपारी 4 वाजता राणेंची पत्रकार परिषद
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 1:15 PM

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील भाषणात भाजप नेते नारायण राणे आणि त्यांच्या दोन मुलांवर जोरदार हल्ला चढवला. मुख्यमंत्री ठाकरेंनी राणे यांची तुलना बेडकाशी करत, एक बेडून आणि त्याची दोन पिल्ल डराव डराव करत आहेत, अशा शब्दात टीकास्त्र डागलं. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आता नारायण राणे स्वत: पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर देणार असल्याची माहिती मिळतेय. दुपारी 4 वाजता भाजप प्रदेश कार्यालयात राणेंची पत्रकार परिषद होणार आहे. (Narayan Rane will reply to Uddhav Thackeray from the press conference )

दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राणे पिता-पुत्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अभिनेत्री कंगना रानौतवर शरसंधान साधलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राणेंची तुलना एका बेडकाशी केली. ‘एक बेडूक आणि त्याची दोन पिल्लं डराव डराव करत आहेत. आपण गोष्टीत बेडकीने बैल पाहिला हे ऐकले असेल. पण या बेडकाच्या पिल्लांनी वाघ पाहिला. त्यानंतर ही पिल्ले आपल्या वडिलांकडे गेली. तेव्हा मोठ्या बेडकाने ओरडायचा प्रयत्न केला. पण त्याचा आवाज आता चिरका झाला’, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राणेवर टीका केली.

उद्धव ठाकरे यांच्या टीकेला आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. ‘अभिनेत्री दिशा सालियन मृत्यू प्रकरणात कोण अडकलं आहे? हे सर्वांना माहिती आहे. वेगळं सांगण्याची गरज नाही. या प्रकरणाचा योग्य तपास झाला तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागेल, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

…तुमचेही बाप काढू

‘मुख्यमंत्र्यांनी काल जी भाषा वापरली ती अत्यंत चुकीची आहे. एवढाच सामना करायचा असेल तर एकदा होऊन जाऊ द्या. वेळ आणि ठिकाण सांगा आम्ही येऊ. मग समजेल’, असं थेट आव्हान निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. त्याचबरोबर ‘कलानगरमध्ये काय चालतं ते सर्व बाहेर काढू, हे सर्व किस्से ऐकण्यासाठी महाराष्ट्र कान टवकारून बसला आहे, असा इशाराही निलेश राणे यांनी दिलाय.

संबंधित बातम्या:

दिशा सालियन प्रकरणातील सत्य बाहेर आलं तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल, निलेश राणेंचा दावा

उद्धव ठाकरे धमकी कोणाला देता; राणेंचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान

Narayan Rane will reply to Uddhav Thackeray from the press conference

Non Stop LIVE Update
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?
साताऱ्यात उदयनराजेंचं पुन्हा कमळ, नाशकात छगन भुजबळ? लोकसभा कोण लढणार?.
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा
उद्धव ठाकरेंची यादी जाहीर अन काँग्रेससोबत खटके, या दोन जागेवरून हंगामा.
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय
माळशिरसच्या मोहिते पाटलांचं ठरलंय, हाती तुतारी घेणार? पवारांसोबत जमलंय.
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'
नवनीत राणांचा प्रचार करणार? बच्चू कडू म्हणाले, 'त्यांच्या बापाची...'.
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत
'मोदी आणि माझ्यात वाद नाही'; केंद्रीय मंत्री गडकरींची EXCLUSIVE मुलाखत.
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?
शाहांसोबत राज ठाकरेंची काय चर्चा?यशवंत किल्लेदारांनी काय फेसबुक पोस्ट?.