मोदी सरकार देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही: सुप्रिया सुळे

पुणे: दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यामुळं मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण देशात अस्वस्थता असताना सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही, ही बाब दुर्दैवी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. याशिवाय सुप्रिया सुळेंनी धनगर आरक्षणावरुनही मोदी सरकारवर टीका केली. केंद्र आणि राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा घणाघात त्यांनी केला. राज्य […]

मोदी सरकार देशाच्या सुरक्षेबाबत गंभीर नाही: सुप्रिया सुळे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

पुणे: दहशतवादी हल्ल्याच्या इशाऱ्यामुळं मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज संपूर्ण देशात अस्वस्थता असताना सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही, ही बाब दुर्दैवी आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

याशिवाय सुप्रिया सुळेंनी धनगर आरक्षणावरुनही मोदी सरकारवर टीका केली. केंद्र आणि राज्य सरकार धनगर समाजाची फसवणूक करत असल्याचा घणाघात त्यांनी केला. राज्य शासनाने धनगर आरक्षणाबाबत कोणताही प्रस्ताव पाठवलेला नसल्याने हा विषय रेंगाळत  पडल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं.

खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती रेल्वे स्थानकात सुरु असलेल्या कामांची पाहणी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर कडाडून हल्ला चढवला. मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आल्याबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “सातत्यानं सुरक्षितता आणि रोजगारीबद्दल बोललं जात होतं. पण सध्या दहशतवादाशिवाय दुसरं काहीही ऐकायला मिळत नाही. पुलवामाच्या घटनेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटोसेशन करण्यात व्यस्त होते.  हे सरकार दहशतवादाबद्दल गंभीर नाही ही बाब दुर्दैवी आहे. केवळ भाषणापुरतं 56 इंच छाती असल्याचं सांगितलं गेलं. नोटबंदीनंतर दहशतवाद कमी होईल असंही सांगण्यात आलं. मात्र गेल्या दोन वर्षात कधी नव्हती इतकी अस्वस्थता संपूर्ण देशात पहायला मिळत आहे”

धनगर आरक्षणावरुन टीकास्त्र

मुंबईत धनगर समाज आरक्षणाबद्दलची बैठक निष्फळ ठरली. याविषयी बोलताना सुप्रिया सुळे यांनी याबद्दल आश्चर्य वाटत नसल्याचं म्हटलं. बारामतीत जेव्हा आंदोलन झालं, तेव्हाच हे फसवं आश्वासन असल्याचं जाणवलं होतं. राज्य सरकारनं आजपर्यंत धनगर आरक्षण प्रस्तावाचा एकही कागद दिलेला नाही. केंद्र आणि राज्यातलं भाजप सरकार केवळ या कष्टकरी समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला.

हे सरकार कष्टकरी, शेतकरी, कामगार, महिला यांच्या हिताविरोधातलं सरकार आहे. त्यांना आजतागायत या घटकांचे प्रश्नच समजत नाहीत. शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम या सरकारनं केलं आहे. शेतकऱ्यांचं खच्चीकरण केलं. सरकारच्या धोरणांमुळेच हा देश विकासात मागे पडल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.

चुकीचं काम करणाऱ्या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. त्यामुळं देशात आणि राज्यात महाआघाडी करुनच निवडणुका लढवल्या जाणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.