नाशिककरांना आधारला मोबाईल, ई-मेल लिंक करण्याची संधी; पोस्टातूनही काढता येणार पैसे, कसे घ्या जाणून…

नाशिक विभागातील डाक कार्यालयात आधारकार्डला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी लिंक करण्याची मोहीम 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुरू राहणार आहे.

नाशिककरांना आधारला मोबाईल, ई-मेल लिंक करण्याची संधी; पोस्टातूनही काढता येणार पैसे, कसे घ्या जाणून...
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 7:05 AM

नाशिकः नाशिक डाक विभागाने पोस्टमन, डाकसेवक यांच्या माध्यमातून विभागातील डाक कार्यालयात UIDAI च्या CELC ॲपद्वारे नागरिकांच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अद्ययावत करण्याची विशेष मोहिम सुरू केली आली आहे. 31 डिसेंबर 2021 पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे, अशी माहिती नाशिक डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली आहे.

कुठे साधावा संपर्क?

विभागातील सर्व डाक कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सेवेमुळे नागरिकांना आधारकार्डला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी लिंक करता येणार आहे. त्याअनुषंगाने नाशिक विभागातील सर्व नागरिकांनी तसेच मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी सर्व रहिवाशांसाठी तसेच मोठ्या आस्थापना किंवा कार्यालयांचे प्रमुखांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे एकाच वेळेस अद्ययावत माहिती लिंक करण्याकरिता जवळच्या डाक कार्यालयाशी अथवा पोस्टमन यांच्याशी संपर्क साधवा, असे आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी आयपीपीबीच्या www.ippbonline.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

असे काढा पैसे

नाशिक डाकघर विभागाची इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही लोकाभिमुख बँक असून प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाचे लाभ पोस्टमनच्या माध्यमातून लॉकडाऊनच्या काळात घरपोच अदा केले आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही भारत सरकारने भारतीय डाक विभागामार्फत सुरू केलेली बँकिंग सेवा आहे. त्याद्वारे धन अंतरण (मनी ट्रांसफर), थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, आरटीजीएस या सुविधांचा लाभ घेण्यासाठी बँक खाते आधारशी जोडले असेल तर आधार सक्षम पेमेंट सिस्टीम (Aeps) सेवेद्वारे कोणत्याही बँकचे पैसे पोस्टमन, डाक सेवक किंवा आपल्या जवळ असलेल्या पोस्ट ऑफिसमधून काढू शकतात. अशा विविध सुविधा या बँकेतर्फे देण्यात येत असल्याची माहितीही प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी दिली आहे.

नाशिक डाक विभागाने पोस्टमन, डाकसेवक यांच्या माध्यमातून विभागातील डाक कार्यालयात UIDAI च्या CELC ॲपद्वारे नागरिकांच्या आधारकार्डला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अद्ययावत करण्याची विशेष मोहिम सुरू केली आली आहे. नाशिक विभागातील सर्व नागरिकांनी तसेच मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी सर्व रहिवाशांसाठी डाक कार्यालयाशी संपर्क साधावा.

– मोहन अहिरराव, प्रवर डाक अधीक्षक

इतर बातम्याः

OBC reservation| ओबीसी आरक्षणासाठी समता परिषद मैदानात; नो रिजर्व्हेशन, नो इलेक्शनचा नारा

Nashik Market Committee| नाना विघ्ने, खुसपटांमुळे लांबलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त

Republic Day| आरोग्य विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा; प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी 2 विद्यार्थ्यांची निवड

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.