तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, नाशिककर रस्त्यावर उतरणार

नाशिक : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर नाशिकमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. बदली रद्द करण्यात यावी यासाठी नाशिककर उद्या रस्त्यावर उतरणार आहेत. इतका कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आयुक्त नाशिकला मिळालेला असतानाही त्यांची अवघ्या नऊ महिन्यात का बदली केली, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केलाय. तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागात सह सचिव म्हणून बदली …

तुकाराम मुंढेंची बदली रद्द करा, नाशिककर रस्त्यावर उतरणार

नाशिक : कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर नाशिकमध्ये असंतोषाचं वातावरण आहे. बदली रद्द करण्यात यावी यासाठी नाशिककर उद्या रस्त्यावर उतरणार आहेत. इतका कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आयुक्त नाशिकला मिळालेला असतानाही त्यांची अवघ्या नऊ महिन्यात का बदली केली, असा संतप्त सवाल सामान्य नागरिकांनी उपस्थित केलाय. तुकाराम मुंढे यांची मंत्रालयात नियोजन विभागात सह सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढे हे प्रामाणिकपणे काम करत होते, त्यामुळे सत्ताधारी पक्षाला आणि अनधिकृत काम करणाऱ्यांना त्यांचा त्रास होत असल्यामुळेच ही बदली केली. जनसामान्यांच्या त्यांनी अनेक समस्या सोडवल्या. त्यांच्या वॉक विथ कमिशनर कार्यक्रमामुळे गोरगरिबांच्या समस्या सुटल्या. प्रत्येक नागरिकाची समस्या एकूण ते सोडवत होते. त्यांनी नाशिकच्या विकासाला चालनाही दिली होती. मात्र त्यांची बदली केल्यामुळे त्यांच्या चांगल्या कामांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे.

या कामांना ब्रेक लागू नये आणि तुकाराम मुंढे परत नाशिकमध्ये यावेत, यासाठी नाशिककर मोर्चा काढणार आहेत. गोल्फ क्लब मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय असा या आंदोलनाचा मार्ग असणार आहे. तुकाराम मुंढे हे नाशिकमध्ये आयुक्त पदावर राहावे आणि त्यांची बदली रद्द झाली पाहिजे, यासाठी हजारोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी रहावं यासाठी आवाहन करण्यात आलंय.

भाजपचे नगरसेवक आणि तुकाराम मुंढे यांच्यातील संघर्ष सुरुच होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर हा संघर्ष काहीसा मावळला होता. म्हणूनच तुकाराम मुंढे यांच्यावरील प्रस्तावित अविश्वास ठराव मागे घेण्यात आला. पण अखेर स्थानिक पदाधिकाऱ्यांसमोर नमतं घेत मुख्यमंत्र्यांनी तुकाराम मुंढेंची बदली केलीच. परिणामी जनता संतप्त झाली आहे.

लोकप्रतिनिधी निवडण्याचं स्वातंत्र्य जनतेला आहे. पण व्यवस्थेला गरज असणारा अधिकारी कायम ठेवणं हे जनतेच्या हातात नाही. त्यामुळे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या जनतेला कशाची गरज आहे हे ओळखणं गरजेचं आहे. वैयक्तिक वादांमुळे जर असे कर्तव्यदक्ष अधिकारी आपण गमावणार असू, तर विकास कसा होणार असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *