Nashik Election | नाशिक नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळच्या टप्प्यात 28 % मतदान

Nashik Election | नाशिक नगरपंचायत निवडणुकीसाठी सकाळच्या टप्प्यात 28 % मतदान
voters

नाशिक नगर पंचायतीच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची उद्या मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Jan 18, 2022 | 12:52 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यातील नगरपंचायतीच्या (Nagar Panchayat) दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीसाठी 8 जागांसाठी आज सकाळी मतदान सुरू झाले असून, साडेअकरापर्यंत सरासरी 28 टक्के मतदान झाले आहे. दुसऱ्या टप्यात 20 उमेदवार मैदानात आहेत. नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यात तीन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे देवळा येथे 4, निफाड 3, कळवण आणि दिंडोरी येथे प्रत्येक 2 जागांवर अशा एकूण 11 जागांची निवड स्थगित करून येथे सोडत काढून पुन्हा प्रक्रिया घेण्यात आली. या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे.

मतदान शांततेत सुरू

नाशिक जिल्ह्यातील 6 नगरपंचायतींच्या 87 जागांसाठी पहिल्या टप्प्यात मंगळवार, 21 डिसेंबर रोजी मतदान झाले. त्यासाठी 292 उमेदवार रिंगणात आहेत. या टप्प्यातही किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत झाले होते. आज दुसऱ्या टप्प्यातही मतदान शांततेत सुरू आहे. सध्या थंडी थोडी कमी आहे. त्यामुळे साडेअकरापर्यंत त्या तुलनेत मतदान चांगले झाले आहे. देवळा येथे 27.58 %, निफाड येथे 21.13 % तर दिंडोरी येथे 41.39 % मतदान झाले आहे. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढेल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची उद्या मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.

अशी होतेय लढत

जिल्ह्यातील निफाड, पेठ, सुरगाणा, देवळा, दिंडोरी आणि कळवण या नगरपंचायतींची निवडणूक सध्या सुरू आहे. सुरगाणा आणि पेठ नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षण नाही. त्यामुळे येथे सर्वच्या सर्व 17 जागांवर निवडणूक होत आहे. निफाड आणि दिंडोरी नगरपंचायतीत 14 जागांवर मतदान झाले. देवळा येथे फक्त 11 जागांवर मतदान झाले. या ठिकाणी 5 जागा ओबीसीसाठी राखीव होत्या. या निवडणुकीत एकूण 4 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यात देवळा येथील दोन आणि दिंडोरी, कळवण नगरपंचायतीतील एकेका उमेदवाराचा समावेश आहे.

दिंडोरीतही रंगत

दिंडोरीत 17 प्रभागांपैकी 15 प्रभागांत 63 उमेदवारांनी 82 अर्ज दाखल केले होते. याठिकाणी 11 उमेदवारांचे 30 अर्ज माघारी घेण्यात आले. त्यामुळे सध्या 52 उमेदवार रिंगणात आहेत. कळवमध्ये 14 प्रभागात 48 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. येथे 9 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे 39 जागांवर सामना रंगणार आहे. पेठ तालुक्यात 17 प्रभागांसाठी 75 जणांनी उमेदवारी दाखल केली होती. येथे दोन अर्ज बाद ठरले, एकाने माघार घेतली. त्यामुळे 72 जणांमध्ये निवडणूक होत आहे. निफडामध्ये चौघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे सध्या 14 जागांसाठी 43 उमेदवारांमध्ये लढत होईल. सुरगाणा येथे दोघांनी माघार घेतली आहे. त्यामुळे 17 प्रभागात 72 जणांमध्ये निवडणूक होणार आहे. देवळ्यात 11 जागांसाठी 38 अर्ज आले होते. त्यात 5 जणांनी माघार घेतली. त्यामुळे 33 जणांमध्ये लढत होणार आहे.

साडेअकरापर्यंतचे मतदान असे

– देवळा – 27.58 %

– निफाड – 21.13%

– दिंडोरी – 41.39%

– एकूण – 28% मतदान

इतर बातम्याः

Nashik | नाशिकमध्ये कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवली का; बळींच्या रेकॉर्डमध्ये पावणेतीन हजारांची भर कशी?

Nashik | आजपासून कडक हेल्मेटसक्ती; पहिल्यांदा पाचशेचा दंड, दुसऱ्यांदा खोड मोडणारी कारवाई होणार

महाराष्ट्र पक्षीमित्र संघटेला 40 वर्षे पूर्ण; आजवर 64 संमेलनांचे आयोजन, पर्यावरण चळवळीच्या अनोख्या कार्याला उजाळा…!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें