ग्रामपंचायतीचा कौल, नाशकात भाजपला पालिकेसाठी धोक्याची घंटा?

नाशिक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीला मिळालेला कौल ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. (Nashik Gram Panchayat Election 2021 Update)

ग्रामपंचायतीचा कौल, नाशकात भाजपला पालिकेसाठी धोक्याची घंटा?
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 6:05 PM

नाशिक : नाशिक जिल्ह्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीचं वर्चस्व बघायला मिळालं. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाविकासआघाडीमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर दुसरीकडे भाजपला मात्र आत्मचिंतन करण्याची गरज आहे. दरम्यान नाशिक ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाविकासआघाडीला मिळालेला कौल ही भाजपसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. (Nashik Gram Panchayat Election 2021 Update)

नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये महाविकासआघाडीचा बोलबाला बघायला मिळाला. मालेगाव, येवला, इगतपुरी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने कळवण , निफाड या ग्रामपंचायतींमधे जोरदार मुसंडी मारत आपली ताकद दाखवून दिली.

त्र्यंबकेश्वरच्या तिन्ही ठिकाणी काँग्रेसने बाजी मारली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पॅनेलने नांदगावमध्ये देखील विजय खेचून आणला. दुसरीकडे बागलाण मतदारसंघाव्यतिरिक्त भाजपाला चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे एकूणच जिल्ह्याचा विचार करता ग्रामपंचायत निवडणुकांचा हा निकाल भाजपाला आत्मचिंतन करायला लावणार आहे, असे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे.

महाविकासआघाडीत उत्साहाचे वातावरण

तर दुसरीकडे राज्यभरातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांच्या निकालामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साह आहे. जर अशाच पॅटर्नने निवडणुका लढल्यास येणाऱ्या काळात जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणुकादेखील महाविकास आघाडीच्या असतील असा विश्वास शिवसेनेनं व्यक्त केला आहे. (Nashik Gram Panchayat Election 2021 Update)

तसेच येत्या काळात महापालिका निवडणुकाही तोंडावर आहे. या निवडणुकांसाठी महाविकासआघाडीकडून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीतील धक्कादायक चित्र पाहता भाजपला पालिका निवडणुकांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

भाजपसाठी धोक्याची घंटा 

नाशिक ग्रामपंचायतींच्या 621 जागांसाठी जवळपास 80 टक्के मतदान झालं होतं. या मतदानाचा एकूणच कौल बघता महाविकासआघाडीला जिल्ह्यात चांगले मतदान झाल्याचं चित्र होतं. तर दुसरीकडे भाजपाला मात्र आत्मपरिक्षण करायला लावणारे हे कौल असल्याचं बोललं जातं आहे.

त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळांची तसेच महाविकासआघाडीची ताकद वाढली आहे. तर दुसरीकडे भाजपाने जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून दिल्याचं चित्र आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भाजप डॅमेज कंट्रोलसाठी नेमक्या काय उपाययोजना करणार? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. (Nashik Gram Panchayat Election 2021 Update)

संबंधित बातम्या : 

Gadchiroli Gram Panchayat | गडचिरोलीत दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी, 486 मतदान केंद्रांवर मतदान

ग्रामपंचायत निवडणूक : रिअ‍ॅलिटी चेक करा, भाजप चौथ्या नंबरचा पक्ष, सत्यजित तांबेंचा टोला

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.