कांद्यासाठी कंटेनर न पाठवण्याचे फर्मान, व्यापाऱ्यांची छगन भुजबळांकडे धाव

कांद्यासाठी कंटेनर न पाठवण्याचे फर्मान, व्यापाऱ्यांची छगन भुजबळांकडे धाव
कांदा

नाशिकः जिल्ह्यात कांद्यासाठी कंटेनर न पाठवण्याचे फर्मान काढल्याने कांदा व्यापाऱ्यांनी थेट छगन भुजबळ यांच्याकडे गाऱ्हाणे मांडलेय. कंटेनरद्वारे कांद्याची असलेली प्रतवारी आणि कांदा हा सुरक्षित निर्यात करण्यासाठी योग्य साधन असल्याने कंटेनरचा पर्याय निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांनी निवडल्याने ट्रक व्यवसायावर परिणाम होत आहे. (nashik lasalgaon market Order not to send containers for onions, traders rush to Chhagan Bhujbal) […]

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Vaibhav Desai

Jul 10, 2021 | 7:55 PM

नाशिकः जिल्ह्यात कांद्यासाठी कंटेनर न पाठवण्याचे फर्मान काढल्याने कांदा व्यापाऱ्यांनी थेट छगन भुजबळ यांच्याकडे गाऱ्हाणे मांडलेय. कंटेनरद्वारे कांद्याची असलेली प्रतवारी आणि कांदा हा सुरक्षित निर्यात करण्यासाठी योग्य साधन असल्याने कंटेनरचा पर्याय निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांनी निवडल्याने ट्रक व्यवसायावर परिणाम होत आहे. (nashik lasalgaon market Order not to send containers for onions, traders rush to Chhagan Bhujbal)

कांद्यासाठी कंटेनर न पाठवण्याचे फर्मान

त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील ट्रक वाहक-मालक संघटनेने याला विरोध दर्शवत कंटेनर चालक आणि मालकांना दमबाजी करत नाशिक जिल्ह्यात कांद्यासाठी कंटेनर न पाठवण्याचे फर्मान काढलेय. कांदा व्यापाऱ्यांनी लासलगाव दौऱ्यावर आलेले राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना निवेदन देऊन लक्ष देण्याची विनंती केली.

केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणाचा कांद्याला फटका

केंद्र सरकारच्या आयात-निर्यात धोरणाचा नेहमीच फटका हा कांदा व्यापाऱ्यांना बसत असतो. यामुळे त्याचा थेट परिणाम हा कांद्याच्या बाजार भाव पाहायला मिळतो, आता कोठे तरी कांद्याची निर्यात ही सुरळीत सुरू झाली आहे, यात कांद्याचे वांदे नाशिक जिल्ह्यातील ट्रक वाहक संघटनेने करण्यास सुरुवात केल्याने त्याचा थेट परिणाम हा कांद्याचा बाजारभावावर पाहायला मिळतोय.

कांदा दोन हजारांच्या आत आल्याने कांदा उत्पादकांना फटका

दोन हजार रुपयांच्या वर गेलेला कांदा हा दोन हजार रुपयाच्या आत आल्याने कांदा उत्पादकांसह निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांना ही बसताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी होत असताना या कांद्याची निर्यात करावी कशी, असा प्रश्न आता निर्यातदार कांदा व्यापाऱ्यांसमोर उभा राहिलाय.

जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांकडून कांदा खरेदी

लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख 15 बाजार समित्यांमध्ये खरेदी केलेला कांदा हा सुरक्षित व योग्य प्रतवारीमध्ये कंटेनरच्या माध्यमातून मुंबई बंदरावर पाठविला जातो, तेथून पुढे तो परदेशात रवाना केला जातो. परंतु गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील काही ट्रक चालक व मालक यांच्या संघटनेने कांदा व्यापाऱ्यांना व कंटेनर चालक मालकांना दमबाजी करण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम कांदा व्यवसायावर परिणाम होत आहे.

ट्रकमधून कांदा पाठविल्यास कांद्याचे मोठे नुकसान

व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर मोठ्या प्रमाणात कांदा पडून असल्याने कांद्याची निर्यात करावी कशी हा प्रश्न आता उभा राहिला आहे. ट्रकमधून कांदा पाठविल्यास कांद्याचे मोठे नुकसान होत असल्याने कंटेनर हे वेळेत उपलब्ध झाले पाहिजेत व कुठलाही अडथळा येऊ नये यासाठी भुजबळांना दिलेल्या निवेदनामध्ये मागणी करण्यात आल्याचे लासलगाव व्यापारी अध्यक्ष बोलत आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असलेल्या या प्रश्नाकडे छगन भुजबळ व भुजबळांच्या माध्यमातून नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक लक्ष देणार का याकडे आता कांदा व्यापाऱ्यांसह उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्या

ठरलं, गोकुळकडून दूध खरेदी दरवाढ जाहीर, दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय

ईडीकडून जरंडेश्वर कारखाना सील, 22 हजार हेक्टरवरील ऊसाचं काय करायचं? शेतकऱ्यांचा मोर्चा

nashik lasalgaon market Order not to send containers for onions, traders rush to Chhagan Bhujbal

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें