नाशिकमध्ये सुसाट मर्सिडीजचे स्टेअरिंग अचानक लॉक, चालकाचा जागीच मृत्यू

नाशिकमधील आडगावनजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मसिर्डीज चालकाचा जागीच मृत्यू झाला.

नाशिकमध्ये सुसाट मर्सिडीजचे स्टेअरिंग अचानक लॉक, चालकाचा जागीच मृत्यू

नाशिक :  नाशिकमधील आडगावनजीक भरधाव वेगाने जाणाऱ्या मर्सिडीज कारचे स्टेअरिंग अचानक लॉक झाल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात मसिर्डीज चालकाचा जागीच मृत्यू झाला. दिंडोरीतील पालखेड येथील गायकवाड यांचा मृत्यू झाला. सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या वाहनाच्या यंत्रणेत अचानक बिघाड झाल्याने मर्सिडीजही सुरक्षित नाही का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

नाशिकमध्ये सध्या ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस बरसत आहे. अपघात झालेली मर्सिडीज आडगावजवळ भरधाव वेगाने आली. त्यावेळी अचानक गाडीचे स्टेअरिंग लॉक झाले. भरधाव वेगात स्टेअरिंग लॉक होण्याचा बहुदा हा पहिलाचा प्रकार म्हणावा लागेल. वेगवान गाडीचे स्टेअरिंग लॉक झाल्याने भीषण अपघात झाला. त्यामुळे या अपघातात गाडीच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला.

नेमका हा अपघात कसा झाला, गाडीत काय तांत्रिक बिघाड झाला, यापूर्वी या कारमध्ये असे बिघाड झालेत का असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत. मात्र सर्वात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या कारमध्येही जीव गेल्याने त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *