भेसळीसाठी दुधात प्लास्टिकचं मिश्रण, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

या दुधाच्या गाठी प्लास्टिक सदृश्य दिसू लागल्या आणि रबरसारख्या ताणल्या जाऊ लागल्याने दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला. अन्न आणि औषध प्रशासनाने या दुधाचे नमुने घेतले असून तपास सुरू आहे.

भेसळीसाठी दुधात प्लास्टिकचं मिश्रण, नाशिकमधील धक्कादायक प्रकार

नाशिक : आतापर्यंत तुम्ही प्लास्टिकची अंडी बाजारात फसवणूक करुन विकली जात असल्याचं ऐकलं आणि पाहिलं असेल, मात्र नाशिकमधून धक्कादायक प्रकार समोर आलाय. पाथर्डी फाटा परिसरात दुधात भेसळीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दूध गॅसवर तापायला ठेवलं असता त्यातून वेगळाच गंध येऊ लागला आणि दुधामध्ये गाठी तयार होऊ लागल्या. या दुधाच्या गाठी प्लास्टिक सदृश्य दिसू लागल्या आणि रबरसारख्या ताणल्या जाऊ लागल्याने दूध भेसळीचा प्रकार उघडकीस आला. अन्न आणि औषध प्रशासनाने या दुधाचे नमुने घेतले असून तपास सुरू आहे.

पाथर्डी फाटा येथील आनंद नगरमधील द्वारकेश सोसायटीमधील रहिवाशाने रविवार संध्याकाळी आनंद नगर पोलीस चौकीसमोरील आई आश्रम स्वीट्स बाहेरील दूध विक्रेत्याकडून नेहमीप्रमाणे दूध खरेदी केलं. दरम्यान सोमवारी सकाळी दूध गॅसवर तपायला ठेवलं असता त्यातून वेगळाच गंध येऊ लागला आणि दुधामध्ये गाठी तयार होऊ लागल्या. या दुधाच्या गाठी प्लास्टिक सदृश्य दिसू लागल्या आणि रबरासारख्या ताणल्या जाऊ लागल्याने दूध भेसळीचा प्रकार असल्याचा संशय आला. यानंतर संबंधित ग्राहकाने त्यांचे मित्र नगरसेवक राकेश दोंदे यांना माहिती कळविली.

यानंतर भेसळीचा प्रकार असल्याचं लक्षात येत गेलं आणि त्याची नगरसेवकांनीही गांभीर्याने दखल घेत संबंधित माहिती एफडीएला देण्यात आली. सदर प्रकार हा गंभीर असून अन्न व औषध तपासणी विभागात आणि स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधित विक्रेत्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ग्राहकांनी केली आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *