नाशिक-मुंबई लोकल रेल्वेची चाचणी 15 दिवसात

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी,  नाशिक: नाशिककरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. कारण नाशिक मुंबई लोकलसेवा लवकरच सुरु होणार आहे. येत्या 15 दिवसात या लोकलची चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे नाशिककर चाकरमान्यांसाठी ही सर्वात मोठी गूड न्यूज म्हणावी लागेल. नाशिक-मुंबई लोकलसेवा सुरु करा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती.  ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. …

नाशिक-मुंबई लोकल रेल्वेची चाचणी 15 दिवसात

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी,  नाशिक: नाशिककरांचा प्रवास आणखी सुपरफास्ट होणार आहे. कारण नाशिक मुंबई लोकलसेवा लवकरच सुरु होणार आहे. येत्या 15 दिवसात या लोकलची चाचणी केली जाणार आहे. त्यामुळे नाशिककर चाकरमान्यांसाठी ही सर्वात मोठी गूड न्यूज म्हणावी लागेल. नाशिक-मुंबई लोकलसेवा सुरु करा अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होती.  ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. येत्या 15 दिवसात कल्याण ते नाशिक रोड लोकल सेवेची चाचणी होणार आहे.

नाशिक-कल्याण लोकल चाचणीसोबतच राजधानी एक्स्प्रेसदेखील मनमाड मार्गे धावणार आहे. मध्य रेल्वेकडून या चाचण्यांची तयारी सुरु आहे. या चाचण्या यशस्वी झाल्यास तात्काळ लोकल सुरु होण्याची शक्यता आहे.

नाशिकमधून दररोज मुंबईला येणारे हजारो प्रवासी आहेत. ते प्रवासी नाशिक-मुंबई असा प्रवास दररोज करतात. सध्या त्यांना एक्स्प्रेस गाड्यांचा पर्याय आहे. पण एक्स्प्रेस रेल्वेमधून प्रवास करताना काही अडचणी येतात. त्यामुळे नाशिककरांची हक्काची लोकल रेल्वे असावी अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे. ती आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

सध्या मुंबईवरुन नाशिकला जाताना अनेकजण मुंबईवरुन कसाऱ्यापर्यंत लोकलने जातात. तिथून पुढे काळी पिवळी शेअर टॅक्सीने (वडाप) नाशिकपर्यंत पोहोचतात. वडापवाल्यांचे दर हे लहरी असतात. ते कधीही वाढतात आणि कितीही वाढतात. त्यामुळे नाशिक- कल्याण जर लोकल सुरु झाली तर नाशिककरांचा प्रवास जलद, परवडणारा आणि सुखकर होईल, असा विश्वास त्यांना आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *