Nashik | छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक करत नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून कानडीगांचा निषेध

छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत रविवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून कानडीगांचा निषेध नोंदवण्यात आला.

Nashik | छत्रपती शिवरायांना दुग्धाभिषेक करत नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून कानडीगांचा निषेध
नाशिकमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून राष्ट्रवादी काँग्रेसने कर्नाटक सरकारचा निषेध नोंदवला.
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Dec 19, 2021 | 4:28 PM

नाशिकः छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करत रविवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून कानडीगांचा निषेध नोंदवण्यात आला. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांचाही यावेळी समाचार घेण्यात आला.

बोम्मईंविरोधात घोषणाबाजी

कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा व्हिडिओ शुक्रवारी रात्री व्हायरल झाला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट आहे, असे धक्कादायक विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केले होते. या विधानाच्या निषेधार्थ शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाथर्डी फाटा येथे रविवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करून अभिवादन केले. त्यानंतर कर्नाटक सरकारचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.

कारवाईची मागणी

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यावेळी म्हणाले की, संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची बंगळुरू येथे झालेली विटंबना निषेधार्ह आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरून त्यांचे या घटनेला समर्थन असल्याचे निदर्शनास येते. बंगळुरूची उन्नती शहाजीराजेंमुळेच झाली याची जाण ठेवून केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

निंदनीय घटना

प्रदेश उपाध्यक्ष नानासाहेब महाले म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना बंगळुरू येथे झाली. जनतेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यासाठी महाराजांच्या पुतळ्यास दुग्धभिषेक करण्यात आला आहे. राजांनी १८ पगड जातींना एकत्र आणत स्वराज्याची स्थापना केली. मुघलांच्या राज्याचा अंत करत हिंदवी स्वराज्य स्थापन केले. देशामध्ये खऱ्या अर्थाने समतेचा विचार रुजवला, आशा थोर राजाच्या पुतळ्याची विटंबना अतिशय निंदनीय आहे.

मोदी छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत

अपूर्व हिरे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आले आहेत. मात्र, त्यांच्या भाजपच्या राज्यात या समाजकंटकांनी हे कृत्य केले. आम्ही छत्रपतींना दैवत मानतो, त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून समाजकंटकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, अनिता भामरे, संजय खैरनार, महेश भामरे, दत्ताकाका पाटील, बाळासाहेब गीते, प्रशांत खरात, योगेश दिवे, मकरंद सोमवंशी, दादा कापडणीस, हर्षल चव्हाण, पुष्पा राठोड, योगिता आहेर, सिम्मी केसी, संगीता सानप, संतोष भुजबळ, विक्रांत डहाळे, अजय पाटील, मनोज हिरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

इतर बातम्याः

St. Thomas Church| नाशिकच्या सेंट थॉमस चर्चमध्ये फादरने बिशपसमोर घेतले पेटवून; वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न

ठाण्यात राष्ट्रवादीचा शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक; बोम्मईंच्या प्रतिमेला जोडे मारो!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें