Nashik Trees | उड्डाणपुलासाठी एकही झाड तोडू देणार नाही; पर्यावरणप्रेमी आक्रमक, निवडणुकीच्या तोंडावर वाद चिघळणार!

विकास म्हणजे गगनचुंबी इमारती. विकास म्हणजे भले मोठे उड्डाणपूल. विकास म्हणजे अगडबंब अशी धरणे. मग या भ्रामक विकासाच्या कल्पना साकारण्यासाठी डोंगरे कापण्यापासून ते शेकडो, हजारो झाडांच्या कत्तली करायच्या. याच्याचविरोधात आता नाशिककर उभा राहताना दिसतोय.

Nashik Trees | उड्डाणपुलासाठी एकही झाड तोडू देणार नाही; पर्यावरणप्रेमी आक्रमक, निवडणुकीच्या तोंडावर वाद चिघळणार!
नाशिकमधील उंटवाडी परिसरातील हा पुरातन वटवृक्ष तोडण्यापासून वाचवण्यात आला.
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 11:51 AM

नाशिकः विकास म्हणजे गगनचुंबी इमारती. विकास म्हणजे भले मोठे उड्डाणपूल. विकास म्हणजे अगडबंब अशी धरणे. मग या भ्रामक विकासाच्या कल्पना साकारण्यासाठी डोंगरे कापण्यापासून ते शेकडो, हजारो झाडांच्या (Trees) कत्तली करायच्या. याच्याचविरोधात आता नाशिककर उभा राहताना दिसतोय. त्यांनी एका 200 वर्षांच्या वटवृक्षाला वाचवण्यासाठी केलेले श्रम फळाला आलेत. आता त्यांनी नाशिकमधल्या त्रिमूर्ती चौकात उभारल्या जाणाऱ्या उड्डाणपुलासाठी एक झाड तोडू देणार नसल्याचा इशारा दिलाय. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण चिघळणारय.

नेमके प्रकरण काय?

नाशिकमधील त्रिमूर्ती चौकात उड्डाणपूल उभारण्यात येणारय. त्यासाठी एक महाकाय असा दोनशे वर्षांपेक्षा जुना वटवृक्ष आणि इतर शेकडो कमीत कमी साडेचारशे ते पाचशे झाडे तोडावी लागणार आहेत. याविरोधात पर्यावरण प्रेमी एकटवले आहेत. याची दखल घेत स्वतः पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी संवाद साधला. त्यांना प्रस्तावित उड्डाणपुलाच्या डिझाईनची पुनर्रचना करण्याची विनंती केली. या उड्डाणपुलासाठी एक 200 वर्षे जुने झाड आणि इतर साडेचारशेपेक्षा झाडे तोडावी लागतील. 200 वर्ष जुने वटवृक्ष आणि त्यामधील मंदिराचे जतन करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

महापौर म्हणतात…

त्रिमूर्ती चौकातील उड्डाणपुलाबाबत महापौर सतीश कुलकर्णी म्हणाले की, या उड्डाणपुलासाठी जवळपास 250 कोटी रुपयांच बजेट आहे. या भागात सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे हा उड्डाणपूल प्रस्तावित आहे. मात्र, यात सत्ताधारी भाजप आणि विरोधकांमध्ये ही वाद सुरू आहे. यांसदर्भात हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. आता पर्यावरण मंत्र्यांच्या सूचनेचे पालन करून वटवृक्ष कसा वाचवता येईल याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.

पर्यावरण प्रेमी म्हणतात…

आता पर्यावरण प्रेमी या उड्डाणपुलाविरोधात आक्रमक झाले आहेत. जुना वटवृक्ष तर वाचवूच, पण परिसरातील एकही झाड तोडू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. अजिंक्य गीते, चंद्रकांत पाटील, प्रशांत लोणारी अशा सामाजिक कार्यकर्त्यांसह ब्रह्मगिरी बचाव समिती, म्हसोबा देवस्थान समिती आक्रमक झाली आहे. याबद्दल महापालिकेकडे हरकती नोंदवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

इतर बातम्याः

Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!

Nashik Trees | पर्यावरण मंत्र्यांच्या एका सूचनेमुळे 200 वर्षे पुरातन वटवृक्षासह 450 झाडे वाचणार, प्रकरण काय?

Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी सुरू!

Non Stop LIVE Update
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.