पाटलांची पाटीलकी जाणार… कोण असणार नवे ‘एसपी’

शिंदे सरकारने तीन दिवसापूर्वी रात्री उशिरा 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

पाटलांची पाटीलकी जाणार... कोण असणार नवे 'एसपी'
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Oct 02, 2022 | 3:35 PM

नाशिक : राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या (IPS) बसल्या ह्या दसऱ्यानंतर लागलीच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच नाशिकच्या ग्रामीण (Nashik Rural) पोलीस दलाचे प्रमुख पोलीस अधिक्षक (Superintendent of Police) सचिन पाटील यांच्याही बदलीची चर्चा सुरू झाली आहे. सचिन पाटील यांचा कार्यकाळ पूर्ण न होताच 9 सप्टेंबर 2021 ला सचिन पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी कॅटमध्ये याचिका दाखल करत दाद मागितली होती. त्यानुसार पाटील यांच्या बदलीला स्थगिती मिळाली होती. मात्र नुकतीच कॅटमध्ये सुनावणी झाली असून सचिन पाटील यांच्या जागेवर शहाजी उमाप यांची बदली करण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांची बदली अटळ असून शहाजी उमाप हे नवे पोलीस अधिक्षक असण्याची शक्यता दाट आहे.

शिंदे सरकारने तीन दिवसापूर्वी रात्री उशिरा 44 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामुळे आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी होणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मात्र, शिंदे सरकार दसऱ्यानंतर आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लागलीच करणार असून त्यात नाशिकच्या ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधिक्षकांची बदली अटळ आहे.

9 सप्टेंबर 2021 ला सचिन पाटील यांची बदली राज्य गुप्त वार्ता विभागात उपायुक्त म्हणून केली होती. मात्र कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांनी कॅटमध्ये धाव घेतली होती.

सचिन पाटील यांनी बदली होण्यापूर्वी नाशिकमधील शेतकरीफसवणूक, अवैध गुटखा कारवाई, रेवपार्टी आणि अवैध धंद्यावर कारवाई केली होती त्यामुळे पाटील यांच्या बदलीविरोधात काही संघटना रस्त्यावर उतरल्या होत्या.

त्यातच नाशिक शहर पोलीस दलातील उपायुक्त देखील पोलीस अधिक्षकपदावर जाण्यास इच्छुक होते, मात्र जोपर्यंत गृह विभाग आदेश काढत नाही तोपर्यंत स्पष्टता येणार नाही.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.