इगतपुरी तालुक्यात संततधार पाऊस; अवकाळी पावसाने रब्बी हंगामही हातचा गेला, बळीराजा चिंताग्रस्त!

इगतपुरी तालुक्यातील विविध भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस  झाला आहे. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे.

इगतपुरी तालुक्यात संततधार पाऊस; अवकाळी पावसाने रब्बी हंगामही हातचा गेला, बळीराजा चिंताग्रस्त!
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 8:40 AM

नाशिक :  इगतपुरी तालुक्यातील विविध भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली. विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस  झाला आहे. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून, बळीराजा हवालदिल झाला आहे. पावसामुळे खरीप हंगामासोबत रब्बी हंगाम देखील वाया गेला, मात्र अद्यापही महसूल प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत व नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

इगतपुरी तालुक्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले. ऊस, कापूस, गहू,  हरभरा, धान अशा पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे गव्हाचे पीक तर भुईसपाट झाल्याचे पहायला मिळत आहे. तालुक्यात सोमवारी रात्रभर पाऊस सुरू होता. रात्रभर सुरू असलेल्या पावसाने आज पहाटे विश्रांती घेतली. दरम्यान खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. निदान रब्बी हंगाम तरी साधला जाईल या आशेने शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा नव्या जोमाने पिकांची पेरणी केली. मात्र आता देखील अवकाळी पाऊस पडल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव 

अवकाळी पावसासोबतच गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण आहे. या वातावरणाचा मोठा फटका हरभाऱ्या सारख्या पिकांना बसला आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव झाला असून, उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता वर्तवण्या येत आहे.

संबंधित बातम्या 

धक्कादायक: रस्त्यावरील खड्ड्यामुळे हादरे बसल्याने रायफलमधून सुटली गोळी, हिंगोलीत जवानाचा मृत्यू!

बीडच्या कैद्याचा कारनामा! कारागृहातून 5 देशांतील लोकांना कोट्यवधींचा गंडा, मोठे हवाला रॅकेट उघड होण्याची शक्यता!

ST Strike| पवार-परबांची साडेचार तास बैठक; कोणताही ठोस निर्णय नाही, संपाचा तिढा कायम!

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.