नाशकात खासगी हॉ्स्पिटलमधला ऑक्सिजन साठा संपला अन् 30 रुग्णांचा श्वास कोंडला, वाचा नेमकं काय घडलं?

या घटनेमुळे आता कोरोनाच्या उद्रेकामुळे नाशिकमधील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे. | Nashik Coronavirus

नाशकात खासगी हॉ्स्पिटलमधला ऑक्सिजन साठा संपला अन् 30 रुग्णांचा श्वास कोंडला, वाचा नेमकं काय घडलं?
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 12:07 PM

नाशिक: कोरोना रुग्णांच्या झपाट्याने वाढत असलेल्या संख्येमुळे आता पुण्यापाठोपाठ नाशिकमधील आरोग्ययंत्रणा कोलमडायला सुरुवात झाली आहे. नाशिक शहरामध्ये कोरोनाबाधित (Coronavirus) रुग्णांना बेड, रेमेडीसीवर इंजेक्शन यांच्यानंतर आता ऑक्सिजनचा तुटवडा देखील जाणवू लागला आहे. नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात ऑक्सिजनचा साठा संपल्याने जवळपास 30 रुग्णांचा जीव धोक्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Corovirus situation get worsened in Nashik)

यापैकी व्हेंटिलेटरवर असलेल्या सहा रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवताना नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागली. या घटनेमुळे आता कोरोनाच्या उद्रेकामुळे नाशिकमधील आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असल्याचे समोर आले आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ऑक्सिजन तुटवड्याचं दाहक वास्तव समोर आलं आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेनं अधिग्रहित केलेल्या सुविचार हॉस्पिटलमधील ऑक्सिजन साठा संपला आणि अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली. याच रुग्णालयात व्हेंटिलेटरवर आणी ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची मोठी संख्या होती. तातडीनं या रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी त्यांना हलवण्याची धावपळ सुरू झाली. अखेर रुग्णांच्या नातेवाईकांनी मोठी धावपळ करून व्हेंटिलेतर वर असलेल्या 6 रुग्णांना इतरत्र हलवले.

नाशिक शहरामध्ये गुरवारी कोरोना रुग्ण संख्येने आत्तापर्यंतचे सर्व आकडे मागे टाकले असताना शहरांमध्ये बेड, रेमडिसिव्हर आणि लस यांचा तुटवडा तर आहेच. मात्र आता ऑक्‍सिजनचा देखील तुटवडा वाढल्याने नागरिकांनी जबाबदारी ओळखत प्रशासनाचं काम हलकं करावं अशी मागणी होते आहे.

नाशिकमध्ये सध्या कोरोनाची परिस्थिती काय?

एकूण अ‍ॅक्टिव्ह रुग्ण – 19735 काल दिवसभरात एकूण मृत्यू – 11 नाशिकमध्ये दररोज साधारण 3500 ते 4000 चाचण्या मृत्यू दर – 3 ते 3.5 टक्के दर रोज लसीकरण – 5500- 6000 नाशिक मध्ये पॉझिटिव्हिटी रेट – साधारण 35% लसीचा साठा – चार दिवस पुरेल इतका लसीचा एकूण साठा – 189360 कोव्हीशिल्ड – 163100 कोव्हॅक्सीन – 26260 ऑक्सिजन साठा – अपुरा

पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’

राज्यातील कोरोनाच्या मुख्य हॉटस्पॉटपैकी एक असलेल्या पुण्यात दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होत चालली आहे. कोरोना रुग्णांची (Coronavirus) संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. या संकटात आता आणखीनच भर पडली आहे. कारण, सामान्य लोकांना कोरोना उपचार घ्यायचे झाल्यास आशेचे केंद्र असलेले जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये हे सेंटर भरले आहे. सध्याच्या घडीला या कोव्हिड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

संबंधित बातम्या:

पुण्यात कोरोनाचा कहर, रुग्णांसाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि लसीची आकडेवारी काय? वाचा आयुक्तांची माहिती

मोठी बातमी: पुण्यात व्हेंटिलेटर्स बेड संपले, ऑक्सिजन बेडसचाही तुटवडा, आता कोव्हिड सेंटरही ‘हाऊसफुल्ल’

Video | अहमदनगरमध्ये मृतदेहांचा खच, एकाचवेळी तब्बल 22 जणांना अग्नी, दिवसभरात 42 अत्यंसंस्कार

(Corovirus situation get worsened in Nashik)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.