प्रा. वासंती सोर यांच्या निधनाने सर्वोदय चळवळीचा आधारस्तंभ हरपला : छगन भुजबळ

ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर यांच्या निधनाने सर्वोदय चळवळीचा आधारस्तंभ हरपला असल्याच्या शोकभावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत.

प्रा. वासंती सोर यांच्या निधनाने सर्वोदय चळवळीचा आधारस्तंभ हरपला : छगन भुजबळ
Follow us
| Updated on: Jul 19, 2021 | 10:42 PM

नाशिक : ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका आणि शिक्षणतज्ज्ञ प्रा. वासंती सोर यांच्या निधनाने सर्वोदय चळवळीचा आधारस्तंभ हरपला असल्याच्या शोकभावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहेत. (Death of Prof. Vasanti Sore loses pillar of Sarvodaya movement: Chhagan Bhujbal)

छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे की, प्रा. वासंती सोर या महात्मा गांधींजींनी स्थापन केलेल्या आणि आचार्य विनोबा भावे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या वर्धा येथील महिलाश्रमात लहानाच्या मोठ्या झाल्या. विनोबाजींच्या सानिध्यात शिकण्याचे भाग्य त्यांना लाभले होते. त्याच ठिकाणी त्यांनी 6 वर्षे अध्यापनाचेही काम केले. विनोबाजींच्या भूदान पदयात्रेत काही काळ त्यांच्या सहभाग होता. महात्मा गांधीजींच्या मांडीवर बसण्याचे भाग्य लाभल्याचे त्या अभिमानाने सांगत. तसेच जन्मापासून अंगाला खादी शिवाय दुसऱ्या वस्त्राचा स्पर्श ही न झाल्याचा उल्लेखही त्या नेहमी करत. आयुष्यभर स्वतः काताई केलेल्या खादीचे वस्त्र आणि कपडे वापरण्याचे व्रत त्यांनी जपले होते.

लौकिक अर्थाने त्या एम. ए. (हिंदी) एम. एड. झाल्या व नाशिकच्या बी. एड. कॉलेजमध्ये अनेक वर्ष अध्यापनाचे काम केले. त्याच कॉलेजच्या प्राचार्य म्हणून त्या निवृत्त झाल्या. निवृत्तीनंतर त्या पूर्णपणे सामाजिक जीवनात कार्यरत झाल्या. गांधी विचारांची अभ्यासपूर्ण मांडणी ही त्यांची विशेषता होती. नाशिकच्या जीवन उत्सव या पर्यावरणीय जीवन शैली व गांधी विचारावर काम करणाऱ्या उपक्रमाच्या त्या आधारस्तंभ होत्या.

स्वतःचा जीवन प्रवास समस्यामय असूनही त्यांनी कधी ही त्याचे प्रदर्शन, तर केले नाहीच पण सर्व समस्यांना खंबीरपणे तोंड देऊन त्या स्वतः सदैव हसतमुख असत. त्यांच्या जाण्याने गांधी आणि सर्वोदय परिवाराची कधीही न भरून येणारी हानी झाली असून जीवन उत्सव परिवार पोरका झाला आहे. मी व माझे कुटुंबीय सोर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, असे भुजबळ यांनी शोकसंदेशात शेवटी म्हटले आहे.

इतर बातम्या

राज ठाकरेंच्या उत्तर भारतीय भाषणांचा विपर्यास, ते लिंक पाठवणार आहेत, भेटीनंतर चंद्रकांतदादांनी गप्पांचे डिटेल्स सांगितले

शेतीच्या नुकसानीचं नेमकं कारणं शोधलं, शेतकऱ्यांसाठी तरुण संशोधकाची किफायतशीर हवामान केंद्राची निर्मिती

“काँग्रेस शिवसेना एकत्र येऊ शकतात, मनसे-भाजप युती तर नाशिककरांसाठी नवीन नाही”

(Death of Prof. Vasanti Sore loses pillar of Sarvodaya movement: Chhagan Bhujbal)

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.