मुंडके छाटण्याची भाषा नको, भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचं उदयनराजेंना आव्हान

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गाजतोय. कर्नाटकच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहीलं.

मुंडके छाटण्याची भाषा नको, भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्या; संजय राऊत यांचं उदयनराजेंना आव्हान
संजय राऊत
Follow us
| Updated on: Dec 02, 2022 | 6:19 PM

नाशिक – उदयनराजे भोसले यांच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतीत महाराष्ट्राच्या भावना तीव्र आहेत. त्या भावनांचा स्फोट उदयनराजे यांच्या वाणीतून होत असतो. ते सातारच्या गादीचे छत्रपती आहेत. त्यांच्या मनातून चिड बाहेर येणं स्वाभाविक आहे. त्यांनी मुंडक छाटण्याची भाषा न करता आधी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा. भाजपनं आमच्या दैवताचा आपमान केला आहे. उलट त्यांचं समर्थन केलं जातं. अशावेळी त्या पक्षात राहणं योग्य नाही, असं मला वाटतं, असं शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न गाजतोय. कर्नाटकच्या सचिवांनी महाराष्ट्र सरकारला पत्र लिहीलं. तिथं महाराष्ट्रातील मंत्र्यांना पाठवू नका. असं त्यांच म्हणणं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले, सीमाप्रश्नावर दोन्ही राज्यात लढाया झाल्या. शाब्दिक वाद झाले.

तीन महिन्यापासून कर्नाटक सरकारमध्ये हिंमत आली कशी. बेळगाववासीयांची गाऱ्हांनी ऐकायला जाऊ, असं ते म्हणतात. राज्यातील क्रांतिकारी सरकार काय करतं. जनतेनं यांची क्रांती स्वीकारली का. बेळगावात तुम्हाला पाय ठेवू दिलं जात नाही.

संजय राऊत म्हणाले, आम्ही जाऊ. अत्यंत हतबल, लाचार सरकार राज्यात आहे. हे काहीही करू शकणार नाही. महाराष्ट्रानं दोन समन्वयक मंत्री नेमले आहेत. पाकिस्तानला जायला बंदी आहे. महाराष्ट्रातून कर्नाटकात जायला काय. अनेक मंत्री-आमदार जातात-येतात. आमचं वैयक्तिक वाद नाही. हा माणूसकीचा लढा आहे. अन्याय, अत्याचाराविरोधातील लढा आहे.

तुम्ही जाऊन दाखवा तिथं. यांचा काय भरोसा. यांनीचं सचिवांना पत्र पाठवा म्हणून सांगितलं, असेल, अशी शंका व्यक्त केली. पंतप्रधान काय करणार. त्यांनी हा प्रदेश केंद्रशासित करावा. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्याकडं वजन आहे. मग, हा प्रदेश केंद्रशासित करून घ्यावा, असंही संजय राऊत म्हणाले.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.