गंगापूर भरल्याने नाशिककर तुपाशी!

गंगापूर भरले की, नाशिककरांची तहान भागते. पाण्याच्या चिंतेशिवाय त्यांचा वर्ष सरतो. यावर्षी सुरुवातीला पाठ फिरवलेल्या पावसाने ऐन सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गंगापूर धरण समूह काठोकाठ भरला आहे.

गंगापूर भरल्याने नाशिककर तुपाशी!
नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण भरले आहे.
Follow us
| Updated on: Oct 01, 2021 | 4:26 PM

नाशिकः नाशिककरांची तहान भागवणारे गंगापूर धरण शंभर टक्के भरल्याने या धरणातील पाण्याचे शुक्रवारी दणक्यात पूजन करण्यात आले. यावेळी महापौर, महापालिका आयुक्त यांच्यासह सर्वपक्षीय स्थानिक नेते उपस्थित होते

गंगापूर भरले की, नाशिककरांची तहान भागते. पाण्याच्या चिंतेशिवाय त्यांचा वर्ष सरतो. यावर्षी सुरुवातीला पाठ फिरवलेल्या पावसाने ऐन सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे जिल्ह्यातील धरण, नद्या, नाले तुडूंब भरले. गोदावरीला चार पूर येऊन गेले. गंगापूर धरण समूह ओसंडून वाहतोय. नाशिकरांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी. मात्र, या बातमीला दुःखाची एक काळी झालर आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतात दोन-दोन फूट साचले. खरिपाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आता पाऊस नको, नको अशी विनवणी शेतकरी करत आहे. त्यात जोरदार पावसाने गंगापूर धरण ओसंडून वाहते आहे. हे धरण भरल्याने महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी शुक्रवारी विधिवत जलपूजन केले. यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, मनसेचे स्थानिक नेते उपस्थित होते.

14 धरणे काठोकाठ भरली

गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या जोरदार हजेरीमुळे नाशिकमधली 14 धरणे काठोकाठ भरलीयत, तर जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीचा चेंडू सीमेपार गेलाय. जिल्ह्यात पावासने लावलेल्या दमदार हजेरीमुळे अनेक ठिकाणी हाहाकार उडालाय. मनमाड, नांदगाव या ठिकाणी दोनदोनदा पूर आला. नाशिकमध्ये गोदामाय चारदा ओसडंली. गंगापूर धरण समूह भरलाय. गंगापूर धरणातून सतत विसर्ग सुरू होता. तूर्तास तरी पावसाच्या या तडाखेबंद बॅटींगनं जिल्ह्याची तहान भागलीय. जिल्ह्यातल्या चौदा धरणांचा पाणीसाठा शंभर टक्क्यांवर गेलाय. त्यात गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी वाघाड, दारणा, भावली, वालदेवी, कडवा, हरणबारी, केळझर, नाग्यासाक्या, माणिकपुंज या धरणांचा समावेशय. तीसगाव, चणकापूर, पुनद ही धरणेही भरण्याच्या मार्गावरयत.

आतापर्यंत 15521.7 मिमी बरसला

नाशिक जिल्ह्यातल्या पर्जन्यमानाची वार्षिक सरासरी ही 15004.69 मिमी आहे. त्यात बुधवारी झालेल्या नोंदीनुसार ही सरासरी आता 15521.7 मिमीवर पोहचलीय. गुलाबी चक्रीवादळानं जिल्ह्यात दमदार पावसानं हजेरी लावली. त्यामुळं अनेक ठिकाणी घरे कोसळली. शेतीचं मोठं नुकसान झालं. सध्या पावसानं पाठ फिरवली तरी हरकत नाही. कारण उरलं-सुरलं खरीप तर पदरात पडेल, अशी आशा शेतकरी करतोय. (Gangapur dam is one hundred percent full, Nashik residents’ water problem solved, water worship is done with enthusiasm)

इतर बातम्याः

सोन्याची आभाळाकडे वाटचाल; नाशिक सराफात पुन्हा उसळी!

खूशखबर! नाशिकमध्ये नोकर भरती मेळावा; 4 ऑक्टोबरला आयोजन

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.