दिवाळीच्या आत अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, भुजबळांचे आदेश

येवला तालुक्यात एकूण 88 तर येवला शहरात 54 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा हा वेग अधिक वाढविण्याबरोबर लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करण्यात यावे. (Guardian Minister Chhagan Bhujbal on corona third wave in foreign)

दिवाळीच्या आत अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, भुजबळांचे आदेश
Chhagan Bhujbal
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 6:54 PM

नाशिक: येवला तालुक्यात एकूण 88 तर येवला शहरात 54 टक्के लसीकरण करण्यात आले आहे. लसीकरणाचा हा वेग अधिक वाढविण्याबरोबर लोकसंख्येच्या प्रमाणात लसीकरण पूर्ण करण्यात यावे. विदेशातील वाढत्या लाटेच्या पार्श्वभुमीवर अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून सर्वप्रथम पहिल्या डोसचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री  छगन भुजबळ यांनी केल्या.

छनग भुजबळ आज येवला व निफाड तालुक्यातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना आढावा बैठक येवला संपर्क कार्यालयात पार पडली, त्यावेळी बोलत होते. विदेशात पुन्हा कोरोनाची लाट वाढत आहे त्यामुळे अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात. साथरोग आटोक्यात आणण्यासाठी स्वच्छतेवर अधिक भर देण्यात यावा. नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करून नवीन कामे देखील सुरू करण्यात यावीत. विकास कामांना अधिक गती देण्यात यावी. अतिवृष्टीसाठी येवल्यात 43 तर निफाड तालुक्यात 3 कोटी मदत निधी प्राप्त झाला आहेत. दिपावलीच्या आत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात यावी, असे ते म्हणाले.

तर गुन्हे दाखल करा

नाशिक-औरंगाबाद रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी अपघात होणार नाही यासाठी अधिक काळजी घेण्यात यावी. रस्त्याचे हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. रस्ते दुरुस्ती करताना अपघात झाले तर निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असंही त्यांनी सांगितलं.

खरीप हंगाम पीककर्ज वाटपाचा घेतला आढावा

येवला तालुक्यातील खरीप हंगामासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक व राष्ट्रीयीकृत बँका यांचा एकूण लक्षांक एकूण 75 कोटी होता. या हंगामात लक्षांकाचे उद्दिष्ट पूर्ण होऊन आतापर्यंत एकूण 84 कोटी 28 लाख 31 हजार इतके पीक कर्ज वाटप करण्यात आले असल्याचे सांगून यावेळी निफाड तालुक्यातील पीक कर्जाचा देखील आढावाही त्यांनी घेतला.

संबंधित बातम्या:

चेंबूरमधील ‘तो’ व्यक्ती मित्रच नाही तर आमचा कार्यकर्ता, नवाब मलिकांच्या आरोपांना नारायण राणेंचं प्रत्युत्तर

अरे, बाबा तुम्हाला कोणी अडवले? या धमक्या द्यायचं बंद करा, जे करायचं ते करा; चंद्रकांत पाटलांचं मलिक यांना आव्हान

Nawab Malik | विधानसभेत मी मोठा गौप्यस्फोट करणार : नवाब मलिक

(Guardian Minister Chhagan Bhujbal on corona third wave in foreign)

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.