Har Ghar Tiranga: नाशिकमध्ये दोन दिवसात 13 हजारांहून अधिक ध्वजांची विक्री, महापालिका कर्मचाऱ्यांना ध्वज खरेदी बंधनकारक 

नागरिकांना तिरंगा खरेदीसाठी आवाहन करतानाच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील ध्वज खरेदी अनिवार्य करण्यात आली आहे. स्वातंत्र्यळढ्याच्या स्मृतींना उजाळा व क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी हार घर तिरंगा  उपक्रम राबविला जात आहे.

Har Ghar Tiranga: नाशिकमध्ये दोन दिवसात 13 हजारांहून अधिक ध्वजांची विक्री, महापालिका कर्मचाऱ्यांना ध्वज खरेदी बंधनकारक 
हर घर तिरंगा अभियान Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 06, 2022 | 10:27 AM

नाशिक, स्वतातंत्र्याच्या अमृत मोहत्सवानिमित्त (azadi ka amrut mahotsav) देशभरात 13 ते 15 ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा (har ghar tiranga) उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत नाशिक  महापालिकेच्या सहा विभागीय कार्यालयांमध्ये दोन दिवसात 13 हजार 458 तिरंगा ध्वजाची विक्री झाली. नागरिकांना तिरंगा खरेदीसाठी आवाहन करतानाच महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील ध्वज खरेदी अनिवार्य करण्यात आली आहे. स्वातंत्र्यळढ्याच्या स्मृतींना उजाळा व क्रांतिकारकांचे स्मरण करण्यासाठी हार घर तिरंगा  उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत नाशिक शहरात प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. विभागीय महसूल आयुक्‍त कार्यालयामार्फत दोन लाख तिरंगा ध्वजाच्या विक्रीचे उद्दिष्ट महापालिकेला देण्यात azadi आले आहे.

त्यानुसार गुरुवार नाशिक रोड विभागात 331, तर सिडको विभागात 61 झेंड्याची विक्री झाली आहे. महापालिकेच्या 4000 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना तिरंगा ध्वज खरेदी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याने ध्वज खरेदी केला की नाही, याची नोंद बंधनकारक करण्याच्या सूचना आयुक्‍त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिल्या.

हर घर तिरंगा उपक्रम यशस्वी करण्यासाठी महापालिका मुख्यालयात आज आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली आहे क्रेडाई, नरेडको या बांधकाम व्यवसायिकांच्या संघटनांसह निमा, आयमा, नाईस, शाळा, महाविद्यालय सामाजिक व स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी आयुक्‍त संवाद साधणार आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे हर घर तिरंगा अभियान?

जगभरातील अधिकाधिक भारतीयांना त्यांच्या घरी तिरंगा फडकवण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी हर घर तिरंगा मोहीम सुरू करण्यात आली आहे. या वर्षी स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना राष्ट्र उभारणीसाठी प्रत्येक नागरिकाच्या समर्पणाचे आणि राष्ट्रध्वजाशी संबंधित वैयक्तिक संलग्नतेचे प्रतीक म्हणून हे अभियान कार्य करणार आहे. हर घर तिरंगा अभियानांतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रत्येक घरात तिरंगा ध्वज फडकवला जाईल. या मोहिमेसाठी प्रत्येक नागरिकाला प्रोत्साहन दिले जाईल. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हे महत्त्वाचे अभियान आहे.

मोहिमेचा उद्देश काय?

नागरिकांच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे आणि राष्ट्रध्वजाची जाणीव वाढवणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भारतामध्ये राष्ट्रीय ध्वज संहिता काय आहे. त्याच्या वापराचे नियम काय आहेत. यासाठी भारत सरकारने ‘फ्लॅग कोड ऑफ इंडिया 2002’ तयार केला आहे. यात राष्ट्रध्वजाचा वापर, प्रदर्शन आणि फडकवण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे देण्यात आली आहेत. 26 जानेवारी 2002 रोजी भारतीय ध्वज संहिता लागू झाली.

Non Stop LIVE Update
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल
हा आचारसंहितेचा भंग नाही?दादांच्या वक्तव्यावर ठाकरेंच्या नेत्याचा सवाल.
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण...
राणा दाम्पत्याची अडसूळांनी काढली अक्कल; म्हणाले, राजकारण सोडेल पण....
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा
पुढे द्रौपदीचा विचार...मुलींच्या जन्मदरावर दादांच्या वक्तव्याची चर्चा.
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार
थेट विमानातून पंतप्रधान मोदी झाले 'त्या' विलक्षण सोहळ्याचे साक्षीदार.
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका
उदयनराजेंना तिकीट मिळालं पण भाजपने अपमान केला, अभिजीत बिचुकलेंची टीका.
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण....
संध्याकाळी 6 वाजेनंतर उमेदवारांना प्रचार करता येणार नाही, कारण.....
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?
मी मी म्हणारे चालत नाही, ज्यांचे पुण्य संपले..., महाजनांचा रोख कुणावर?.
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग
चारही खांदे गेले तर मी..., राम बोलो भाई राम, गुलाबराव पाटलांची बॅटिंग.
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला
राणांची आनंद अडसूळांनी काढली अक्कल,पती-पत्नी त्यांच्या मुलाच्या भेटीला.
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग
पाहिजे तेवढा निधी देऊ, पण आमच्यासाठी बटण दाबा कचा कचा...दादांची बॅटिंग.