सदाबहार सोने अजून स्वस्तच; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी (4 ऑक्टोबर) 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45400 रुपये नोंदवले गेले.

सदाबहार सोने अजून स्वस्तच; जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 3:18 PM

नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी (4 ऑक्टोबर) 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45400 रुपये नोंदवले गेले.

सराफा बाजारात गेल्या महिन्यापासून सोने आणि चांदीच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळते आहे. सदाबहार सोने अजून स्वस्तच आहे. सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर दहा ग्रॅममागे 46500 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45400 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 60600 रुपये नोंदवले गेले. गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर चार दिवसांपूर्वी मोठी उलाढाल झाली होती. त्यानंतर आता सराफा व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दसरा सणाकडे लागले आहेत. साडेतीन मुहूर्तापैकी एक म्हणून दसऱ्याकडे पाहिले जाते. अनेकजण या दिवशी सोन्याची खरेदी करतात. सोन्याच्या अंगठ्या, लॉकेट, नाणे खरेदी करण्यावर ग्राहकांचा भर असतो. यंदा ऑगस्टपर्यंत नाशिकमध्ये म्हणावा तसा पाऊस नव्हता. मात्र, सप्टेंबरमध्ये जोरदार हजेरी लावली. त्यामुळे दसऱ्याला जोरदार उलाढाल होण्याचे संकेत आहेत.

किमती वाढणार

दरम्यान, पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

साठवण्याची जोखीम संपली

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्कारावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजारात सोमवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 46500, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 45400 नोंदवले गेले. – गिरीश नेवासे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

Special Report: गडकरींचा देशीवाद, गाईचे शेण अन् आकाशवाणीची धून!

महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी कंबरेइतक्या पाण्यातून वाट काढत जळगावमध्ये वीजपुरवठा केला सुरळीत!

क्रीडा क्षेत्रासाठी आचारसंहिता; बोगस प्रमाणपत्र प्रकरणानंतर निर्णय, पुण्यात उभारणार ऑलिम्पिक भवन

(In the bullion market of Nashik, the price of 24 carat gold was recorded at 46500)

Non Stop LIVE Update
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.