लासलगाव ग्रामपंचायत ऑनलाइन सेवा देण्यात देशात नंबर एक, बहुतांश कामे पेपरलेस…!

नाशिक जिल्ह्यातली कांद्याची जगप्रसिद्ध बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव येथील ग्रामपंचायत नागरिकांना ऑनलाइन सेवा देण्यात देशात अव्वल ठरलीय. ही सेवा देणारे आपले सरकार चालक बाबा गिते यांचा त्याबद्दल दिल्ली येथे सन्मान करण्यात आला. या यशाबद्दल गिते यांचे जिल्ह्यातून कौतुक करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

लासलगाव ग्रामपंचायत ऑनलाइन सेवा देण्यात देशात नंबर एक, बहुतांश कामे पेपरलेस...!
लासलगाव ग्रामपंचायतीचे बाबा गिते यांचा दिल्लीत गौरव करण्यात आला.
Follow us
| Updated on: Apr 12, 2022 | 4:06 PM

लासलगावः नाशिक (Nashik) जिल्ह्यातली कांद्याची जगप्रसिद्ध बाजारपेठ असणाऱ्या लासलगाव (Lasalgaon) येथील ग्रामपंचायत नागरिकांना ऑनलाइन सेवा (Online Service) देण्यात देशात अव्वल ठरलीय. कॉमन सर्व्हिस सेंटर अंतर्गत नागरिकांना अनेक सेवा एकाच ठिकाणाहून देणाऱ्या देशातील 525 आणि महाराष्ट्रातील 61 पैकी नाशिक जिल्ह्यातल्या 8 आपले सरकार केंद्र चालकांची सीएससी एसपीव्ही कंपनीकडून निवड करण्यात आली. त्यात लासलगावचे बाबा गिते, दुगावचे शुभम खैरे, सिन्नरचे सचिन गिते, देवळालीचे निलेश नागरे, मालेगावचे चंद्रकांत देसले, मोहिउद्दीन अन्सारी, अमोल बच्छाव आणि नाशिकचे नासिर शेख यांचा समावेश आहे. या आठ जणांतून लासलगावचे बाबा गिते यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल बाबा गिते यांचे जिल्ह्यातून कौतुक करण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या वतीनेही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

दिल्लीत झाला गौरव

देशातील सर्वोच्च अशा सेवा देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातल्या या आठ संगणक चालकांची 29 मार्च 2022 रोजी झालेल्या दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये आयोजित एकदिवसीय कार्यशाळेसाठी निवड झाली होती. येथे या संगणक चालकांचा गौरव करण्यात आला. लासलगावचे संगणक चालक बाबा गिते यांनी दैनंदिन कामकाज करून नागरिकांना इतर सर्व शासकीय विभागातील सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. गिते यांच्या या सन्मानाबद्दल आनंद झाला आहे, अशी प्रतिक्रिया लासलगावचे सरपंच जयदत्त होळकर यांनी दिली आहे.

सब कुछ ऑनलाइन

लासलगाव ग्रामपंचायतीध्ये सर्व कार्यालयीन दाखले ऑनलाइन मिळतात. राजपत्र, शॉपअॅक्ट, उद्यम आधार, बँकिंग सेवा, आयुष्यमान भार योजना, शेतकरी सन्मान योजना, कर्जमाफी, मोफत ई-श्रम रजिस्ट्रेशन, पीक विमा, एलआयसी, आरोग्य विमा, वाहनांचा विमा, पोलीस व्हेरिफिकेशन, शालेय विद्यार्थ्यांसाठी महसूल दाखला, नागरिकांना इंटरनेटचा वापर, ऑनलाइन बँकिंग या सुविधा सुरू आहेत. त्यासाठी बाबा गिते हे प्रयत्नशील असतात. त्यामुळे त्यांचा या पुरस्काराने गौरव झाला आहे.

लासलगाव ग्रामपंचायतीमध्ये बहुतांश कामे ऑनलाइन केली जातात. त्यामुळे वेळ वाचतो. सगळ्या प्रमाणपत्रापासून ते इंटरनेट बँकिंगची सुविधा येथे उपलब्ध आहे. त्यामुळे आमच्या केंद्राचा गौरव झाला. याचा आनंद वाटतो.

– जयदत्त होळकर, सरपंच , लासलगाव ग्रामपंचायत

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.