नाट्यगृह सुरु करण्यास थोडा उशीर झाला, पण आता ती ओसाड पडणार नाहीत, याची खात्री : छगन भुजबळ

कोरोनाकाळात सर्व गोष्टी बंद कराव्या लागल्या त्यात दुर्दैवाने नाट्यगृहदेखील बंद झाली. ती सुरु करण्यास थोडा उशीर झाला याची जाणीव आम्हाला आहे मात्र नाट्यगृह आता सुरू झाल्यानंतर ती ओसाड राहणार नाहीत याची खात्री असल्याचं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

नाट्यगृह सुरु करण्यास थोडा उशीर झाला, पण आता ती ओसाड पडणार नाहीत, याची खात्री : छगन भुजबळ
छगन भुजबळ, मंत्री, महाराष्ट्र राज्य
Follow us
| Updated on: Oct 26, 2021 | 9:55 AM

नाशिक : कोरोनाकाळात सर्व गोष्टी बंद कराव्या लागल्या त्यात दुर्दैवाने नाट्यगृहदेखील बंद झाली. ती सुरु करण्यास थोडा उशीर झाला याची जाणीव आम्हाला आहे मात्र नाट्यगृह आता सुरू झाल्यानंतर ती ओसाड राहणार नाहीत याची खात्री असल्याचं राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नाशिक शाखा यांच्या वतीने मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर सन २०२० -२०२१ सन्मान सोहळा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी, पुरस्काराचे मानकरी सर्वश्री शफाहत खान, रंगकर्मी दिलीप प्रभावळकर, सुनील ढवळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे नाशिक शाखेचे अध्यक्ष रविंद कदम, यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील नाट्यरसिक उपस्थित होते.

भुजबळ यांच्या हस्ते नाट्यकार्मिना पुरस्कार प्रदान

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा दर दोन वर्षांनी स्व. वि.वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार, स्व.प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार आणि स्व.बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार मराठी रंगभूमीवर भरीव योगदान देणाऱ्या मान्यवर व ज्येष्ठ लेखन, रंगकर्मी व नाट्यकार्मिना प्रदान करण्यात येतो. यंदाच्या वर्षी वि.वा.शिरवाडकर लेखन पुरस्कार शफाहत खान, प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार ज्येष्ठ रंगकर्मीदिलीप प्रभावळकर तसेच बाबुराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार नाशिकची रंगभूमी समृद्ध करण्यासाठी विशेष योगदान देणारे रवींद्र ढवळे यांना प्रदान करण्यात आला.

रंगकर्मींच्या अडचणी सोडविण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करतोय

यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, नाशिक शाखा रंगभूमीसाठी विविध कार्यक्रम राबवित असते. तसेच रंगकर्मी व त्यांच्या अडचणी व समस्या समजावून घेऊन त्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे यासह विविध कार्यक्रम राबवित असते.

नाट्यगृह सुरु करण्यास थोडा उशीर झाला, पण…

ते म्हणाले की, नाशिक शाखा गेल्या पाच वर्षांपासून रंगभूमीवर अलौकिक कार्य केलेल्या दिवंगत, दिग्गज रंगकर्मींच्या नावाने दहा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.या समारंभास कोविडमुळे उशीर होतोय याची जाणीव आहे. परंतु आता या महामारीवर आपण विजय मिळवत आहोत. त्यामुळे उशिरा का होईना नाशिक शाखेस या सर्व मान्यवरांना गौरविण्याचे भाग्य मिळत आहे. याचे खूप खूप समाधान आहे.

कोविडच्या दरम्यान अनेक हौशी तसेच व्यावसायिक रंगकर्मीचे व पडद्यामागील नाट्यकर्मीचे अतोनात हाल झाले. परंतु नाशिक शाखेच्या माध्यमातून अशा हौशी व व्यावसायिक रंगकर्मी व नाट्यकर्मीना आर्थिक व इतर स्वरूपाची मदत करण्याचा छोटासा प्रयत्न करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर फंडातून नाशिकच्या रंगकर्मींना आर्थिक मदतही देण्यात आल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष या नात्याने शफाहत खान यांना संमेलनादरम्यान होणाऱ्या “मराठी नाटक एक पाऊल पुढे दोन पावले मागे..!” या परिसंवास तर दिलीप प्रभावळकर यांना “बाल साहित्य मेळावा” या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण दिले.

हे ही वाचा :

आर्यन प्रकरणी 25 कोटींची तोडबाजी तर 3500 किलो हेरॉईन प्रकरणात कितीची तोडबाजी?, राऊतांचा ‘रोखठोक सामना’

पुण्याच्या नवले ब्रिजवरील अपघातांचा प्रश्न गडकरींच्या दरबारी, मोहोळ थेट दिल्लीत भेटीला

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.