गुजरातला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचं काम कुठपर्यंत झालं? वाचा सविस्तर

मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे (Minister chhagan Bhujbal visit Manjarpada project).

गुजरातला जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवणाऱ्या मांजरपाडा प्रकल्पाचं काम कुठपर्यंत झालं? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: Apr 02, 2021 | 7:51 PM

नाशिक : मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण होणार असून यंदाच्या पावसाळ्यात येवला, चांदवडला पूर्ण क्षमतेने पाणी उपलब्ध होणार आहे. तसेच भविष्यात या प्रकल्पाच्या माध्यमातून गुजरातकडे वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवून भविष्यात मराठवाड्यासह महाराष्ट्राची तहान भविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. भुजबळ यांनी आज दिंडोरी येथील मांजरपाडा (देवसाने) प्रकल्पाच्या सुरु असलेल्या कामांची आज विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत इतर अधिकारीवर्ग देखील होते (Minister chhagan Bhujbal visit Manjarpada project).

मांजरपाडा प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण

याअगोदरच मांजरपाडा प्रकल्पाचे काम 80 टक्के पूर्ण झाले आहे. दायित्वाला मंजुरी मिळाल्यानंतर मुख्य धरणाचे अपूर्ण असलेले काम गेल्या महिनाभरापूर्वी सुरु करण्यात आले आहे. सद्य स्थितीत प्रकल्पाचे काम 87 टक्क्यांपेक्षा जास्त काम झाले आहे. येत्या मे महिन्याच्या अखेरपर्यंत या प्रकल्पाचे उर्वरित काम पूर्ण केले जाणार आहे. काम सुरू झाल्यापासून 15 मीटर उंचीचे धरणाचे बांधकाम झाले असून आता केवळ 14 मीटर धरणाचे बांधकाम शिल्लक राहिले आहे. त्याचबरोबर धरणाचे मातीकाम 80 टक्के पूर्ण झाले आहे. मांजरपाडा (देवसाने) मुख्य धरणाच्या सांडव्याची घळभरणी सुरू असून हे काम 15 मे पर्यंत करण्याचे नियोजन असल्याने जलदगतीने काम करण्यात येत आहे.

26 गर्डरचे काम पूर्ण

या भागातील देवसाने ते गोगूळ हा रस्ता काही कालावधीसाठी बंद करण्यात आला आहे. देवसाने हे गाव दिंडोरी तालूक्यात असून ते पक्क्या डांबरी सडकेने दिंडोरीला जोडलेले आहे. गोगूळ हे सुरगाणा तालूक्यातील डांगराळे भागातील गाव आहे. घळभरणी पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावे पुन:श्च धरणमाथ्यावरील रस्त्याद्वारे एकमेकांशी जोडले जाणार आहे. या रस्त्यावर एकूण 33 गर्डर बसविण्यात येणार असून त्यापैकी 26 गर्डरचे काम पूर्ण झाले आहे. तर इतर गर्डर बसवण्याचे काम सुरु आहे. सर्व कामे मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

कॅनॉल आणि त्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचं ध्येय

मांजरपाडा धरणाच्या कामासोबतच कॅनॉल आणि त्यावरील रेल्वे क्रॉसिंगचे काम देखील पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येणार आहे. येवला तालुक्यातील डोंगरगाव पर्यंत हे पाणी पोहचणार आहे. विशेष म्हणजे 2019 पासून मुख्य वळण बोगद्याद्वारे पार नदीचे पाणी अंशत: वळविण्यास सुरुवात झाली आहे. धरणाचे काम मे अखेर पर्यंत पूर्ण झाल्यावर पाणी पूर्ण क्षमतेने गोदावरी खोऱ्यात वळविले जाणार आहे. तसेच येत्या पावसाळ्यात पूर्ण क्षमतेने येवला आणि चांडवड तालुक्याला पाणी उपलब्ध होणार आहे (Minister chhagan Bhujbal visit Manjarpada project).

संबंधित बातमी : Special Story | नारपार प्रकल्प : महाराष्ट्राचं पाणी गुजरातला जाणार ही काळ्या दगडावर कोरलेली रेघ

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.