चक्कर येऊन होणाऱ्या मृत्यूनंतर आता नाशकात छातीदुखीमुळे बळी, दोन दिवसांत पाच जण दगावले

अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने 20 एप्रिलला एका दिवसात 11 जण मृत्युमुखी पडले होते. त्याआधीच्या आठवड्यात 13 जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाला होता (Nashik Chest Pain)

चक्कर येऊन होणाऱ्या मृत्यूनंतर आता नाशकात छातीदुखीमुळे बळी, दोन दिवसांत पाच जण दगावले
छातीदुखीच्या तक्रारीनंतर पाच जणांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 10:14 AM

नाशिक : चक्कर येऊन होणाऱ्या मृत्यूंचं उदाहरण ताजं असतानाच आता छातीत दुखू लागल्याने नाशकात बळी जाण्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत अचानक छातीत दुखू लागल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. अचानक होणाऱ्या मृत्यूंबाबत संभ्रम कायम आहे. वाढत्या कोरोना संसर्गाला तोंड देत असताना नाशकात नवं संकट उभं राहिलं आहे. (Nashik five people dies on same day after Chest Pain)

याआधीही चक्कर येऊन अचानक छातीत दुखू लागल्याने नाशिकमध्ये अनेक जणांचे मृत्यू झाले आहेत. वारंवार अशा घटना घडत असल्याने प्रशासनापुढे नवे संकट उभे राहिले आहे.

उष्माघाताने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज

अचानक चक्कर येऊन बेशुद्ध पडल्याने 20 एप्रिलला एका दिवसात 11 जण मृत्युमुखी पडले होते. त्याआधीच्या आठवड्यात 13 जणांचा अशाप्रकारे मृत्यू झाला होता. 15 एप्रिल रोजी एका दिवसात 9 जणांना चक्कर येऊन प्राण गमवावे लागले होते, तर त्याआधी चौघे मृत्युमुखी पडले होते. म्हणजेच दोन आठवड्यात 24 जणांनी चक्कर आल्याने जीव गमावले होते. विशेष म्हणजे मृतांमध्ये तरुणांचाही समावेश आहे. याआधी कोणाचा रस्त्याने पायी जाताना मृत्यू झाला होता, तर कोणाला राहत्या घरीच चक्कर आली होती.

गेल्या काही दिवसात उष्णतेचा पारा चांगलाच वाढला आहे. नाशिक शहराचं तापमान वाढून 40 अंशाच्या पार पोहोचलं आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास होऊन मृत्यू झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. वाढत्या उन्हामुळे चक्कर येऊन मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज याआधीही वर्तवण्यात आला होता. परंतु मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

चक्कर-मळमळ लक्षणांकडे दुर्लक्ष नको

या नव्या प्रकारामुळे वैद्यकीय क्षेत्रातही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. चक्कर येणे, मळमळ होणे यासारख्या कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका, असा सल्ला नाशिक शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांना दिला आहे. संचारबंदीच्या काळात नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतानाही काळजी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

दोन आठवड्यांपूर्वी 13 जणांचा मृत्यू

चक्कर येऊन पडल्याने 10 एप्रिलला नाशिकमध्ये चौघांचा मृत्यू झाला होता. इंदिरानगर, उपनगर, श्रमिकनगर आणि देवळाली गावात या घटना घडल्या होत्या. तर 15 एप्रिल रोजी एका दिवसात 9 जणांना चक्कर येऊन प्राण गमवावे लागले होते. या प्रकरणी संबधित पोलीस ठाण्यांमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | चक्कर येऊन पडल्याने नाशिकमध्ये एकाच दिवशी 9 जणांचा मृत्यू

नाशकात चक्कर येऊन होणाऱ्या मृत्यूंचा आकडा वाढताच, एकाच दिवशी 11 जण दगावले

(Nashik five people dies on same day after Chest Pain)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.