रस्त्यानं जाताना 1 लाख रुपये सापडल्यास काय कराल? रतन खांदवेंच्या कृतीला तुम्हीही सलाम कराल

रतन खांदवे यांनी चुकून कोणाची तरी बॅग पडली असेल आणि ती आपण देऊन टाकू याच भावनेने उचलली. Ratan Khandave Rajaram Kharde

  • विठ्ठल भाडमुखे, टीव्ही 9 मराठी, नाशिक
  • Published On - 12:36 PM, 26 Jan 2021
रस्त्यानं जाताना 1 लाख रुपये सापडल्यास काय कराल? रतन खांदवेंच्या कृतीला तुम्हीही सलाम कराल
रतन खांदवे, राजाराम खर्डे

नाशिक: पैशाच्या लोभापायी माणुसकी हरवली आहे असं आपण सतत म्हणतो.मात्र, नाशिकमधील महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी रतन खांदवे यांनी या शब्दांना खोटं ठरवलं.  खांदवे यांनी अजूनही माणुसकीच जिवंत असल्याचं दाखवून दिलं आहे. नेमकं रतन खांदवे यांनी माणुसकीच दर्शन कसं घडवलं? रतन खांदवे आपल्या पुष्पकनगर म्हसरुळ येथील घरून पंचवटीत निघाले होते. यावेळी त्यांना रस्त्यात अचानक डिव्हायडर जवळ एक बॅग दिसली त्यांनी तात्काळ आपली गाडी थांबवत बॅग उचलली. बॅग उघडून पाहिल्यानंतर त्यामध्ये त्यांना एका व्यक्तीची कागदपत्रं सापडली. (Nashik Ratan Khandave return one lakh rupees to Rajaram Kharde)

बॅगेत आढळले 1 लाख रुपये

रतन खांदवे यांनी चुकून कोणाची तरी बॅग पडली असेल आणि ती आपण देऊन टाकू याच भावनेने उचलली. ती बॅग आपल्या गाडीला अडकवून ते पंचवटीच्या दिशेने निघाले. पुढे पंचवटीत गेल्यानंतर त्यांनी बॅग ओपन करून बघितली असता त्यात राजाराम खर्डे यांचे कागदपत्र आणि काही पैसे दिसले, त्यांनी तशीच बॅग घरी नेली. रतन खांदवे यांनी हा प्रकार त्यांच्या मुलांना सांगितला. घरी जाऊन पैसे मोजले असता ते ती रक्कम 1 लाख रुपये होती.

राजाराम खर्डेंपर्यंत बॅग पोहोचवण्याचा निर्धार

रतन खांदवे यांनी कोणत्याही परिस्थितीत ही बॅग राजाराम खर्डे यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं ठरवलं. रतन खांदवे यांनी ही बॅग घेऊन म्हसरूळ पोलीस ठाणे गाठले. म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकने यांना खांदवे यांनी सर्व प्रकार सांगितला. पंढरीनाथ ढोकने यांनी राजाराम खर्डे यांना फोन केला. बॅग मिळाल्याचं ऐकून राजाराम खर्डेंना सुखद धक्काच बसला.

राजाराम खर्डे यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. बँकेतून पैसे काढून घरी निघालो होतो. घरी जाताना बॅग वाटेत पडल्याचं घरी गेल्यानंतर समजलं. पोलिसांचा फोन आल्यानंतर बॅग सापडल्याची माहिती मिळाली असल्याचं समजल्यावर दिलासा मिळाला, अशी भावना राजाराम खर्डे यांनी व्यक्त केली. राजाराम खर्डे यांनी रतन खांदवे आणि पोलिसांचे आभार मानले आहेत.हॉस्पिटलमध्ये रक्कम भरायची होती मात्र अचानक खर्डे यांच्याकडून बॅग पडली होती.

बॅगेत कागदपत्र असल्यामुळे त्यांना लवकर संपर्क होऊ शकला आणि बॅग सह 1 लाख रुपये कागदपत्र रतन खांदवे यांनी राजाराम खर्डे यांना पोलिसांसमोर परत केले. त्यावेळी राजाराम खर्डे यांना तर आनंद होताच मात्र जास्त आनंद हा खांदवे यांना वाटत होता. कारण त्यांचा प्रामाणिकपणा सर्वांना आदर्श घालून देणारा होता. रतन खांदवे यांचा मोठेपणा सर्वानाच आदर्शवत आहे.अजूनही माणुसकी जिवंत आहे हे रतन खांदवे यांनी दाखवून दिलंय, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकने यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

पुण्यातील बुलेट थाळीनंतर आता ‘तंदुरी निखारा तडका मिसळ’, महाराष्ट्रात कुठे मिळते ही खास मिसळ?

नंदुरबारमधून 40 हजार कुटुंबांसह हजारो बालकांचं स्थलांतर, मुलांसाठी आलेल्या पोषण आहाराचं काय होतं?

(Nashik Ratan Khandave return one lakh rupees to Rajaram Kharde)