Nashik | नाशिक जिल्हाकडे पावसाने फिरवली पाठ, गंगापूर धरणात केवळ 27 टक्केच पाणीसाठा शिल्लक!

शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 27 टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्याने नाशिककरांसमोर पाणीप्रश्न उभा टाकलाय. राज्यात इतर जिल्हात पावसाने दमदार हजेरी लावलीयं. मात्र, नाशिककडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नाशिकच नव्हेतर जिल्हातही म्हणावा तसा पाऊस अद्याप झाला नाहीयं. पावसाळा सुरू होऊनही अद्याप नाशिक जिल्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहे.

Nashik | नाशिक जिल्हाकडे पावसाने फिरवली पाठ, गंगापूर धरणात केवळ 27 टक्केच पाणीसाठा शिल्लक!
Image Credit source: tv9
उमेश पारीक

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jun 30, 2022 | 3:51 PM

नाशिक : पावसाचे माहेर घर म्हणून ओळख असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने धरण साठयात कमालीची घट झाल्याचे पाहायला मिळतेय. नाशिकला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 27 टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलाय. जून महिना उलटून गेला तरीही नाशिककमध्ये पावसाची (Rain) हवी तशी सुरुवात झाली नाहीयं. आधीचं लांबणीवर पडलेला पाऊस जुलैमध्ये देखील दांडी देणार अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती. अशात लवकर पाऊस झाला नाही तर, नाशिककरांना पाणी (Water) कपातीच्या संकटाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

गंगापूर धरणात केवळ 27 टक्के पाणी साठा शिल्लक

शहराची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात केवळ 27 टक्के पाणी साठा शिल्लक राहिल्याने नाशिककरांसमोर पाणीप्रश्न उभा टाकलाय. राज्यात इतर जिल्हात पावसाने दमदार हजेरी लावलीयं. मात्र, नाशिककडे पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. नाशिकच नव्हे तर जिल्हातही म्हणावा तसा पाऊस अद्याप झाला नाहीयं. पावसाळा सुरू होऊनही अद्याप नाशिक जिल्हा दमदार पावसाच्या प्रतीक्षेतच आहे. फक्त गंगापूर धरणच नव्हे तर जिल्ह्यातील संपूर्ण धरणसाठ्यांमध्ये देखील दिवसेंदिवस घट होतेय. अशात पाणीटंचाईला सामोरे जाण्याची चिंता नागरिकांना वाटू लागली आहे.

हे सुद्धा वाचा

पाणीटंचाई होण्याची दाट शक्यता

पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सगळ्या यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. मात्र, पावसानेच यंदा पाठ फिरवल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नाशिक जिह्यातील अनेक भागांमध्ये अध्याप पेरणी देखील करण्यात आली नाहीयं. यामुळे शेतकरी देखील पावसामुळे चिंताग्रस्त आहेत. नाशिक जिल्हाला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाच देखील कमी पाणीसाठा असल्याने पाणीटंचाईची शक्यता आहे. या आठवड्यात अपेक्षित पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें