मान्सूनची माघार, पण उत्तर महाराष्ट्रात अजून दोन दिवस बॅटींग करणार!

अखेर राज्यभरातून मान्सूनने माघार घेतली आहे. मात्र, अजूनही उत्तर महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

मान्सूनची माघार, पण उत्तर महाराष्ट्रात अजून दोन दिवस बॅटींग करणार!


नाशिकः अखेर राज्यभरातून मान्सूनने माघार घेतली आहे. मात्र, अजूनही उत्तर महाराष्ट्रात दोन दिवस जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

गेल्या पंधरा दिवसांपासून मान्सूनच्या परतीकडे आशा लावून बसलेल्या राज्यभरातील नागरिकांना अखेर दिलासा मिळाला आहे. काल म्हणजेच 14 ऑक्टोबर रोजी राज्यभरातून मान्सूनने एक्झिट घेतली आहे. यंदा राज्यात निर्धारीत वेळेच्या पाच दिवस आधीच मान्सूनचे आगमन झाले होते. आता मात्र नैऋत्य मोसमी पावसाने अर्थात मान्सूनने चार दिवस जास्त मुक्काम ठोकत गुरुवारी राज्याचा निरोप घेतला. मात्र, मध्य व दक्षिण भारतात तो आणखी काही दिवस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा मंगळवार (19 ऑक्टोबर) आणि बुधवारी रोजी जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जवळपास 25 ऑक्टोबरनंतर पावसाळी वातावरण हटण्याचा अंदाज आहे. नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली आहे.

धरणे तुडूंब

मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर चार वेळेस पूर आला.नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण भरले आहे. गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील सारीच धरणे भरली आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचाही पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

मराठवाड्यात कोकणपेक्षा जास्त पाऊस

विशेष म्हणजे यंदा मराठवाड्याने सरासरीच्या बाबतीत कोकणालाही मागे टाकले. राज्यात यंदा जालना जिल्ह्यात सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक पाऊस झाला. राज्यात चार जिल्ह्यांत सरासरीपेक्षा सर्वात जास्त पावसाची नोंद झाली. नंदुरबार, सांगली, अमरावती, भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला. आयएमडीच्या अहवालानुसार, 1 जून ते 30 सप्टेंबर या कालावधीत पुढीलप्रमाणे पाऊस पडला.

ऑगस्टमध्ये 15 दिवसांचा ब्रेक

यंदा राज्यातील पावसाचे वितरण असमान राहिले. जून-जुलैमध्ये उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाने दडी मारली. ऑगस्टमध्ये संपूर्ण राज्यात 15 दिवस मान्सूनने ब्रेक घेतला. ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनने ब्रेक घेतला. नंतर पुन्हा सप्टेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टीला सुरुवात झाली. विशेष म्हणजे अवर्षणप्रवण व पर्जन्यछायेत येणाऱ्या मराठवाड्यात यंदा जोरदार पाऊस झाला.

इतर बातम्याः

Special report: घावली मुळमायेची मुळी, नारोशंकरांनी मागे पाहिले अन् माता गोदापात्रात थांबली; राजेबहाद्दरांच्या देवीची रोमहर्षक आख्यायिका!

सप्तश्रृंगी गडावर 500 वर्षांची परंपरा; 4600 फूट उंच सुळक्यावर मध्यरात्री लावला कीर्तीध्वज, जाणून घ्या डोळ्यांचे पारणे फेडणारा सोहळा!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI