नाशकात ओमिक्रॉनचा धोका? 2 खेळाडू दक्षिण आफ्रिकेतून परतले, आरोग्य यंत्रणा सतर्क

दक्षिण आफ्रिकेतून दोन खेळाडू नाशकात परतल्यामुळे आरोग्य यंत्रणांची झोप उडाली आहे. हे दोन्ही आर्यनमॅन स्पर्धेतून चार दिवसांपूर्वी परतले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच या खेळाडूंना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलंय.

नाशकात ओमिक्रॉनचा धोका? 2 खेळाडू दक्षिण आफ्रिकेतून परतले, आरोग्य यंत्रणा सतर्क
omicron
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 8:09 PM

नाशिक : संपूर्ण जगाने सध्या ओमिक्रॉन या नव्या कोरोना विषाणूचा धसका घेतला आहे. महाराष्ट्रातदेखील प्रतिबंधात्मक उपायोजना आणि खबरदारी घेतली जात आहे. मात्र, दक्षिण आफ्रिकेत गेलेले दोन खेळाडू नाशकात परतल्यामुळे आरोग्य यंत्रणांची झोप उडाली आहे. हे दोन्ही आर्यनमॅन स्पर्धेतून चार दिवसांपूर्वी परतले असून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच या खेळाडूंना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलंय.

खेळाडूंचे स्वॅब चाचणीसाठी पाठवले, आरोग्य यंत्रणा सतर्क

मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेतल्या आर्यनमॅन स्पर्धेतून 2 खेडाळू नाशकात परतले आहेत. हे खेळाडू चार दिवसांपूर्वी परतले आहेत. ही माहिती समजताच येथील आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नाशिक आरोग्य प्रशासनाने या खेळाडूंचे स्वॅब चाचणीसाठी पुढे पाठवले आहेत. तसेच सध्या त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आलंय. चाचणी अहवाल आल्यानंतरच त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे की नाही ? हे स्पष्ट होईल.

केंद सरकारच्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागा

तर दुसरीकडे ओमिक्रॉन या नव्या कोरोना व्हायरचा संसर्गदर डेल्टा या कोरोना विषाणूपेक्षा कितीतरी पट जास्त असल्याचा दावा केला जात आहे. या विषाणूवर लसीचा नेमका काय परिणाम होतो यावर संशोधन केले जात आहे. मात्र, राज्य सरकारने केंद सरकारच्या आदेशाची वाट न पाहता कामाला लागा. कोरोनाला थोपवण्यासाठी जे आवश्यक आहे ते करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई

तसेच लॉकडाऊन नको असेल तर लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना नियम पाळणे, मास्कचा वापर करणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करावी. या नियमांची जेथे पायमल्ली होईल त्या संस्था तसेच ठिकाणांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देशदेखील ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिलेले आहेत.

विमानतळावर प्रवाशांची चाचणी

दरम्यान, विदेशातून आलेल्या नागरकांची राज्यातील विमानतळांवर नागरिकांची कोरोना चाचणी केली जात आहे. तसेच एखाद्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचे आढळ्यास त्याच्यावर उपचार करण्यात येत असून त्यांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येत आहे.

इतर बातम्या :

सामान्य शेतकरी कन्या आज मंत्र्यांच्या घरचा उंबरठा ओलांडणार.. कोण आहे प्रेरणा भगवान पाटील?

Know This: दोन्ही लसी टोचल्या खऱ्या, पण आता कोरोनाच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटला त्या आवर घालणार का?

रमाई आवास योजनेतून राज्यात सव्वा लाख घरे बांधणार, धनंजय मुंडे यांची मोठी घोषणा

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.