MALEGAON NEWS : अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लसीकरण दिरंगाईने, जिल्हाधिकाऱ्यांकडून कानउघाडणी; कोरोनाचे निर्बंध जैसे थे

MALEGAON NEWS : अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लसीकरण दिरंगाईने, जिल्हाधिकाऱ्यांकडून कानउघाडणी; कोरोनाचे निर्बंध जैसे थे
जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना सुचना देत असताना
Image Credit source: tv9 marathi

नाशिक (NASHIK) जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे (CORONA) निर्बंध जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. मालेगावमध्ये लसीकरण कार्यक्रमाला अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 18, 2022 | 9:22 AM

नाशिक – नाशिक (NASHIK) जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरोनाचे (CORONA) निर्बंध जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. मालेगावमध्ये लसीकरण कार्यक्रमाला अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे लोकांना कोरोनाची लस मिळालेली नाही. जिल्हाधिकारी गंगाथरन डी (GANGATHARAN D) यांनी आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघाडणी केल्यानंतर सध्या मालेगावमध्ये मनपा, पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी लसीकरणासाठी प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे काल दिवसभरात फक्त 16 लोकांनी लस घेतल्याने आच्छर्य व्यक्त केले जात आहे. ही प्रक्रिया जर अशीच सुरू राहिली तर शंभर टक्के लसीकरण कधी व्हायचं असा अनेकांना प्रश्न पडलाय. तसेच ज्या कारखान्यात किंवा जिथे लसीकरण झालेलं नाही अशी ठिकाण जिल्हाधिकाऱ्यांनी बंद केली आहेत.

अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना अपयश ?

जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी अधिकाऱ्यांची कान उघाडणी केल्यानंतर मनपा, पोलीस, महसूल प्रशासनाचे अधिकारी सकाळपासून लसीकरण मोहिमेला रिंगणात उतरले. मात्र दिवसभरात चार मोठ्या अधिकाऱ्यांनी अवघ्या 16 जणांचे लसीकरण करुन आणल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.चार प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी दिवसभरात मालेगावात अवघ्या 16 नागरिकांचे लसीकरण झाले आहे. अशा गतीने जर लसीकरणाची व्यापक मोहीम सुरु राहिली तर पूर्ण 100 टक्केचा आकडा गाठण्यासाठी मालेगावकरांना किती वर्षांची वाट बघावी, लागले, असा प्रश्न सर्वसामान्य मालेगावकरांना पडला आहे.

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध जैसे थे

मालेगाव शहरात लसीकरणाची टक्केवारी अत्यंत कमी असल्यामुळे संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध जैसे थे आहेत. त्यामुळे निर्बंध शिथील करायचे असतील तर कोरोना लसीकरणाची टक्केवारी वाढली पाहिजे, असे निर्देश नवनियुक्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले. त्यानंतर नाशिक जिल्ह्यात अधिकाऱ्यांनी शहरात व्यापक मोहिम सुरु केली आहे. यंत्रमाग कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी लसीकरण न केल्याचे निर्दशनात येताच कारखाना सील करण्यात आला आहे. मात्र कर्मचाऱ्यांचे तत्काळ लसीकरण झाल्याने कारखाना पुन्हा पूर्ववत सुरु करण्यात आला. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात निर्बंध कमी करण्यात आले आहेत. ज्या भागात कोरोनाचे अधिक रूग्ण आहेत तिथ काही प्रमाणात कोरोनाची नियमावली लावण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यात लसीकरण सुध्दा चांगलं झालं आहे.

माझे वडील IPS, मी पोलीस उपनिरीक्षक, तरुणीला लग्नाची मागणी, पंढरपुरातील भामटा गजाआड

Happy Holi 2022 : कोकणात शिमगोत्सवाला उत्साहात सुरूवात, ढोल ताशांच्या गजरात मंदिराचा परिसर दणाणला

IPL 2022: राष्ट्रनिष्ठा की, IPL, अखेर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूंनी दिलं उत्तर


Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें