नाशिक

नाशिक या नावाचा उगम रामायण या महाकाव्याशी जोडला जातो. त्यानुसार लक्ष्मणाने रावणाची बहीण शूर्पणखा हिचे नाक कापले. त्यामुळे या जागेचे नाव ‘नासिक’ असे पडले. महाराष्ट्र सरकारने बदलून ते नाशिक केले. नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्यामधून वाहते म्हणजे ‘नव शिखां’मधून वाहते. शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून ‘नव शिखा’ नगरी वरून नाशिक झाले. नाशिक जिल्हा समुद्रसपाटीपासून 565 मीटर उंचीवरील महाराष्ट्राच्या उत्तरपश्चिम भागांमध्ये आहे. येथील लोकसंख्या 61,09,522 आहे, तर क्षेत्रफळ 15,582 चौ.कि.मी. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्रातील नाशिक जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे. नाशिक शहरात महापालिकेमध्ये 6 विभाग आहेत. (नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक रोड, सिडको, सातपूर, अंबड). नाशिक जिल्ह्यात महसूल उप-विभाग 9 आहे. तहसील 15 आहे. महसूल मंडळांची संख्या 92 आहे. दोन महानगरपालिका आहेत. एकूण 9 नगरपरिषद आणि 6 नगर पंचायत आहेत. शहरी पोलीस ठाणे 13 तर ग्रामीण पोलीस ठाण्यांची संख्या 40 आहे. जिल्ह्यात एकूण 1383 ग्रामपंचायती आहेत. एकूण गावे 1960 आहेत. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. नाशिक जिल्ह्यात एकूण 15 तालुके आहेत. नाशिक जिल्ह्यात विधानसभेचे 15 व आणि लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. ऐतिहासिक काळापासून नाशिकची धार्मिक स्थळ ही ओळख आहे. रामायणात नाशिक परिसरातील ‘पंचवटी’ येथे श्रीराम वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे. मोगल साम्राज्याच्या काळात नाशिक ‘गुलाबांचे शहर’ म्हणून ‘गुलशनाबाद’ या नावाने ज्ञात होते. नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे प्रमुख केंद्र आहे. दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ह्याच भूमीत झाला. भारतातल्या चार कुंभमेळ्यांपैकी सिंहस्थ कुंभमेळ्याचे क्षेत्र नाशिक आहे. 1200 सालाच्या सुमारास खोदलेली पांडवलेणी आहेत. गोदावरी नदीला नाशकात दक्षिण गंगा म्हणतात. वीर सावरकर, अनंत कान्हेरे, लोकमान्य टिळक, दादासाहेब पोतनीस, बाबूभाई राठी, व्ही.व्ही. शिरवाडकर आणि वसंत कानेटकर यांच्यामुळे नाशिकची सर्वदूर कीर्ती झालीय.

नाशिकच्या राजकीय घडामोडी, गुन्हेगारीसह इतर बातम्या, फोटो, व्हिडीओ आणि लाईव्ह कव्हरेजसाठी टीव्ही 9 मराठीच्या साईटला आवर्जून भेट द्या.

पुढे वाचा

सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला जाणार असाल तर इकडे लक्ष द्या, गडावरील कर्मचारी पुन्हा आंदोलन छेडणार, कर्मचाऱ्यांचा प्रशासनाला इशारा काय?

नाशिक Thu, Mar 23, 2023 11:06 AM

हिंदू मुलांबरोबर लग्न केल्यास… मुस्लिम मुलींसाठी हिंदू हुंकार सभेतून 10 ऑफर; काय आहेत या ऑफर?

नाशिक Thu, Mar 23, 2023 08:42 AM

आजूबाजूच्या बांडगुळामध्ये हिरवा रावण लपलाय; लव्ह जिहादविषयी हिंदू हुंकारमध्ये सगळच धक्कादायक सांगितलं..

नाशिक Wed, Mar 22, 2023 11:12 PM

रात्रीच्या अंधारात शेतीचं नुकसान दिसणार आहे का? अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली की चेष्टा? शेतकऱ्यांचं म्हणणं काय?

कृषी Wed, Mar 22, 2023 11:01 AM

अहो साहेब द्राक्षांऐवजी गांजाची शेती करू द्या… दौऱ्यावर आलेल्या अब्दुल सत्तारांकडे केली अजब मागणी, नेमकं काय घडलं

कृषी Wed, Mar 22, 2023 08:52 AM

“ज्या शेतकरी बांधवांच्या जीवावर राजकारण करतो त्यांच्याशी…; नुकसान पाहणीनंतर मंत्र्यांकडून शेतकऱ्यांना अश्वासन

नाशिक Tue, Mar 21, 2023 11:29 PM

कृषी मंत्र्यांची पाठ वळताच शेतकऱ्यांनीही दिल्या घोषणा 50 खोके…; नुकसान दौऱ्यावरी शेतकरी संतप्त

नाशिक Tue, Mar 21, 2023 09:20 PM

“कृषी मंत्री सत्तार येणार,पण ते आम्हाला काय देणार”; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी पोटतिडकीने केला सवाल…

नाशिक Tue, Mar 21, 2023 06:48 PM

सर्वात मोठी बातमी | खबरदार… 50 खोके म्हणत Video शेअर केलात तर… राज्यात पहिला गुन्हा दाखल, मुख्यमंत्र्यांची बदनामी भोवली!

क्राईम Tue, Mar 21, 2023 04:04 PM

तिच्या पोटात प्रचंड वेदना होत होत्या, ‘तो’ वेळीच धावला, लोक म्हणतायत ‘तो’ देवदूत बनून आला

नाशिक Tue, Mar 21, 2023 09:44 AM

संजय राऊत म्हणतात, लवकरच स्फोट होणार, मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप, काय आहे नेमकं प्रकरण?

नाशिक Tue, Mar 21, 2023 08:49 AM

कल्पना सुद्धा करू शकणार नाही असं 3 महिन्याच्या चिमुकलीसोबत घडलंय, आईला बेशुध्द केलं आणि… नाशिक हादरलं.

क्राईम Tue, Mar 21, 2023 07:48 AM

“भाडेतत्त्वावर माणसं गोळा करुन सभा घेण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या समस्या जाणा”; अवकाळीवरून मुख्यमंत्र्यांना घेरले…

नाशिक Mon, Mar 20, 2023 09:02 PM

पेन्शन बायकोला… आनंद नव-याला… आंदोलनस्थळी नवऱ्यानं केलं हटके सेलिब्रेशन

नाशिक Mon, Mar 20, 2023 06:37 PM

“मालेगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सभेला एक लाखांची गर्दी होणार”; ठाकरे गटानं शिवसेनेला दुसरं आव्हान दिलं..

नाशिक Mon, Mar 20, 2023 05:23 PM

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI