Nashik|नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या लोकशाही दिन; कसा आणि कधी करावा अर्ज, घ्या जाणून…

तालुका लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिनात अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे.

Nashik|नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात उद्या लोकशाही दिन; कसा आणि कधी करावा अर्ज, घ्या जाणून...
Nashik Collectorate
Follow us
| Updated on: Jan 02, 2022 | 3:59 PM

नाशिकः जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवार, 3 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2.00 वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी दिली आहे. सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणींना ‘लोकशाही दिना’त तात्काळ न्याय मिळतो. जिल्हाधिकारी कार्यालय, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त आणि मंत्रालय स्तरावर या दिनाचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्याचा लोकशाही दिन हा जिल्हाधिकारांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होतो.

हे अधिकारी उपस्थित

जिल्हाधिकारी लोकशाही दिनासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा पोलीस आयुक्तालय असल्यास अथवा पोलीस उपायुक्त दर्जाचा अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषी विभागांचे जिल्हास्तरीय प्रमुख अधिकारी व जिल्हा पाणीपुरवठा समन्वय अधिकारी यांची उपस्थिती या दिनादिवशी असते. त्यामुळे संबंधित तक्रारदाराच्या अडचणीचे तात्काळ निवारण होते. त्याला जलद न्याय मिळतो.

कसा करावा अर्ज?

कोरोना महामारीचा प्रादुर्भावाच्या संदर्भाने शासयनाच्या मार्गदर्शक सूचनांचा अवलंब करून लोकशाही दिनासाठी पाठविण्यात येणारे अर्ज विहीत नमुन्यात असावेत, तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे, चारही स्तरावरील लोकशाही दिनाकरिता अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठविण्यात यावा. तालुका लोकशाही दिनानंतर 1 महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिनात अर्ज सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी केले आहे.

हे अर्ज स्वीकारणार नाही

लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व/अपिल्स, सेवा व आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज स्वीकृत केले जात नाहीत. अंतिम उत्तर दिलेले आहे/देण्यात येणार आहे, अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार/निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल तर ते अर्जही स्वीकारले जात नाहीत.

जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात सोमवारी दुपारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी पाठविण्यात येणारे अर्ज विहीत नमुन्यात असावेत, तक्रार किंवा निवेदन वैयक्तिक स्वरूपाचे असावे. तालुका लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा लोकशाही दिनात अर्ज सादर करावेत. – भागवत डोईफोडे, निवासी उपजिल्हाधिकारी

इतर बातम्याः

Warkari Bhavan | सुंदर ते ध्यान…नाशिकमध्ये साकारले द्रविडीयन छाप असणारे वारकरी भवन!

Sahitya Sammelan | 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सासणे बिनविरोध

Nashik Election|नाशिकमध्ये 500 चौरस फुटापर्यंत घरपट्टी माफ करण्याच्या हालचाली; भाजपची शिवसेनेवर कुरघोडी

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.