पाकिस्तानच्या गोळीबारात नाशिकचा जवान शहीद

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आलं आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील जवान केशव गोसावी शहीद झाले आहेत.  काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे सोमवार (दि.11) रोजी दुपारी हा गोळीबार करण्यात आला. केशव गोसावी यांचे पार्थिव पुढच्या काही तासात जम्मूवरुन नाशिकच्या ओझर विमानतळावर आणलं जाणार आहे. त्यानंतर हे पार्थिव केशव यांच्या …

पाकिस्तानच्या गोळीबारात नाशिकचा जवान शहीद

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात महाराष्ट्राच्या जवानाला वीरमरण आलं आहे. नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील जवान केशव गोसावी शहीद झाले आहेत.  काश्मीरमधील नौशेरा सेक्टर येथे सोमवार (दि.11) रोजी दुपारी हा गोळीबार करण्यात आला.

केशव गोसावी यांचे पार्थिव पुढच्या काही तासात जम्मूवरुन नाशिकच्या ओझर विमानतळावर आणलं जाणार आहे. त्यानंतर हे पार्थिव केशव यांच्या सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडी या गावी आणलं जाईल. संध्याकाळी शिंदेवाडी गावातच केशव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

केशव गोसावी हे अवघ्या 29 वर्षांचे होते.  ते गेल्या 10 वर्षांपासून देशसेवेसाठी सीमेवर तैनात होते. केशव गोसावी यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण सिन्नर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

सैन्यात भरती होण्यासाठी जमीन विकली

केशवला लहानपणापासूनच देशसेवेची आवडत असल्याने, त्यांना सैन्यात कोणत्याही परिस्थितीत भरती व्हायचं होतं. पण पैसे नसल्याने शेवटी केशवच्या वडिलांनी वडिलोपार्जित शेती विकली आणि केशवाला सैन्यात भरती केलं.

सुखद बातमी ऐवजी दु:खद बातमी आली

धक्कादायक आणि दु:खत बाब म्हणजे केशव यांची पत्नी नऊ महिन्यांची गरोदर असून, आज त्यांना प्रसुतीसाठी दवाखान्यात नेण्याची तयारी सुरु होती. मात्र, सुखद बातमी येण्यापूर्वीच काळाने  घाला घातला आणि आख्खा महाराष्ट्र दुःखात बुडाला.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *