नवी मुंबईकरांसाठी महापालिकेकडून खुशखबर

मुंबईनंतर आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटापर्यंत चटई क्षेत्र असलेल्या घरांना मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी मुंबईकरांसाठी महापालिकेकडून खुशखबर

नवी मुंबई : मुंबईनंतर आता नवी मुंबईतही 500 चौरस फुटापर्यंत चटई क्षेत्र असलेल्या घरांना मालमत्ता कर संपूर्णपणे माफ करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांपूर्वी मुंबई पालिकेने अशाचप्रकारे 500 चौरस फुटांपर्यंत घरांना मालमत्ता कर माफी दिली होती. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतही हा निर्णय लागू करण्यात आला आहे. यामुळे नवी मुंबईकरांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या आज (19 जुलै) झालेल्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय मंजूर करण्यात आला. यानुसार शहरातील 500 चौरस फुटापर्यंतच्या निवासी घरांना मालमत्ता करमाफी देण्यात येणार आहे. तर 501 ते 750 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता करात 60 टक्के सूट देण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गणेश नाईक यांनी घराच्या मालमत्ता कराचा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता. त्यानुसार आज झालेल्या सर्वसाधारण  सभेत रहिवाशांच्या मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रवादीचे नगरसेवक रवींद्र इथापे यांनी हा ठराव सभेत मांडला.

दरम्यान गेल्या नाईक यांनी अनेक दूरगामी निर्णय घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे नवी मुंबईत गेल्या 20 वर्षांपासून मालमत्ता कर आणि पाणीपट्टीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

लाभ कुणाला?

500 चौरस फुटापर्यंतच्या घरांमध्ये सामान्य नागरिक राहतात. कंडोमिनियम, बैठी घरे, खाजगी इमारतीं, झोपडपटटीधारक प्रकल्पग्रस्त,माथाडी, गाव-गावठाण, शहरी भागामधील रहिवाशांना याचा प्रामुख्याने लाभ होणार आहे. नवी मुंबई पालिका क्षेत्रात एकुण 3 लाख 41 हजार मालमत्ता आहेत. त्यातील जवळपास 1 लाख 94 हजार मालमत्ता धारकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.विशेष म्हणजे या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर कोणताही अतिरिक्त भार पडणार नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *