नवी मुंबईतील एकही कोरोना रुग्ण उपचारांविना राहू नये, गणेश नाईक यांच्या पालिका आयुक्तांना सूचना

कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपायोजना कराव्यात, अशी परखड सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली आहे.( Ganesh Naik Navi Mumbai)

नवी मुंबईतील एकही कोरोना रुग्ण उपचारांविना राहू नये, गणेश नाईक यांच्या पालिका आयुक्तांना सूचना
गणेश नाईक, आमदार
Follow us
| Updated on: Apr 17, 2021 | 7:36 PM

नवी मुंबई: नवी मुंबईतील कोरोना रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी महापालिका प्रशासनाने ठोस उपायोजना कराव्यात, अशी परखड सूचना आमदार गणेश नाईक यांनी केली आहे. नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांना 17 एप्रिल 2021 रोजी पत्र पाठवून गणेश नाईक यांनी कोरोना रूग्णांची वाढती संख्या पहाता सर्वांना वेळेत उपचार द्यावेत आणि कोरोनाचे संभाव्य मृत्यू टाळावेत, असे सांगितले आहे. गणेश नाईक हे आयुक्त बांगर यांच्याबरोबर नियमितपण कोरोना प्रतिबंधात्मक उपायोजनांच्या आढावा बैठका घेत असतात. या बैठकांमधून ते पालिका प्रशासनाला कोरोना नियंत्रणासाठी सूचना करत असतात. (BJP MLA wrote letter to Navi Mumbai Municipal Commissioner to treatment on corona patient)

पालिका काही पातळ्यांवर कमी पडते

पालिका प्रशासनाकडून त्यांना योग्य कार्यवाही सुरू असल्याचे आश्वासित केले जाते. परंतु काही स्तरांवर पालिका कमी पडत असल्याचे दिसून येते आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रूग्णसंख्येचा आलेख वेगाने वाढत आहे. पूर्वी दिवसाला दोन ते तीन कोरोनाने मृत्यू होत असतं हा आकडा आता 9 पर्यंत पोहाचला आहे. मृत्यूदर वाढताना दिसतो आहे, असं गणेश नाईक म्हणाले.

गणेश नाईक यांच्यासमोर नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा

साधे बेड, ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर बेड इत्यादींची उणीव जाणवते आहे. केअर सेंटर कमी पडत आहेत. गंभीर रूग्णांसाठी जीवरक्षक ठरलेले रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळत नाही. अशा प्रकारच्या असंख्य तक्रारींचा पाढा गणेश नाईक यांच्याकडे नागरिकांनी वाचला आहे. नाईक यांनी या समस्यांची गंभीर दखल घेतली आहे. सर्व प्रकारच्या बेडची संख्या, कोविड सेंटरची संख्या आणि रेमडेसिव्हीर सारख्या औषधांची उपलब्धता वाढविण्याची मागणी त्यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली आहे. त्याचबरोबर वाढणारे कोरोना मृत्यू टाळण्यासाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणा उभारण्याची सुचनाही त्यांनी केली आहे. नवी मुंबईतील एकही रुग्ण उपचाराअभावी मागे राहता कामा नये. सर्वांना वेळेत उपचार मिळायला हवेत, अशी सूचना गणेश नाईक यांनी केली आहे.

मुंबई एपीएमसीमध्ये कोरोना नियमांचं उल्लंघन

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील मार्केटमधील गर्दीवर कोणतेही नियंत्रण एपीएमसी प्रशासनाकडून ठेवले जात नाही. तर बाजार आवारातील घटक एपीएमसी प्रशासन आणि नवी मुंबई महापालिकेच्या निर्बंधांना कोणतीच भीक घालत नसल्याचे दिसून येत आहे. नुकतेच राज्य सरकारने कडक नियम जाहीर करून सुद्धा येथील व्यापारी आणि ग्राहक त्या नियमांचे पालन करत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर, सरसकट नियमांचे उल्लंघन होत असल्याने मुंबई एपीएमसी मार्केट लवकरच कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 संबंधित बातम्या:

मुंबई APMC भाजीपाला मार्केटमध्ये तुफान गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कोरोनाचा हॉटस्पॉट ठरण्याची भीती

नवी मुंबईत ICU मधील रुग्णांसाठी चांगली बातमी, 20 दिवसांच्या अतिरिक्त साठ्यासह ऑक्सिजन उपलब्ध

(BJP MLA wrote letter to Navi Mumbai Municipal Commissioner to treatment on corona patient)

Non Stop LIVE Update
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.