कुकशेत ग्रामस्थांच्या जमिनी बिल्डरच्या घशात? 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण, न्यायासाठी राज्यपालांकडे धाव

एमआयडीसीने प्रकल्प उभारणीसाठी घेतलेली जमीन बिल्डरच्या घशात घातल्याचा खळबळजनक आरोप कुकशेत ग्रामस्थांनी केला आहे.

कुकशेत ग्रामस्थांच्या जमिनी बिल्डरच्या घशात? 4 दिवसांपासून बेमुदत उपोषण, न्यायासाठी राज्यपालांकडे धाव
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Feb 24, 2021 | 12:56 AM

नवी मुंबई : एमआयडीसीने प्रकल्प उभारणीसाठी घेतलेली जमीन बिल्डरच्या घशात घातल्याचा खळबळजनक आरोप कुकशेत ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे विकासासाठी शेतजमिनी, राहती घरे कवडीमोल भावाने अधिग्रहण करायची आणि नंतर बिल्डरला विकून मोकळे व्हायचे असा प्रकार ठाणे-बेलापूर एमआयडीसीत होत असल्याचा आरोप होतोय. शिवाय त्याबदल्यात जमिनी आणि घरे गेलेल्या गावाला वाऱ्यावर सोडण्यात आल्याचंही सांगण्यात येत आहे (Kukshet villagers fast for land approach Governor Bhagat Singh Koshyari).

शिरवणे एमआयडीसीमध्ये कुकशेत गावाच्या जागेवर हायड्रिलिया कंपनी उभारण्यात आली. त्यामुळे गावाचे पुनर्वसन नेरुळ सेक्टर चौदा येथे करण्यात आले. शेतजमीन आणि वडिलोपार्जित घरांच्या बदल्यात नोकरीचे आश्वासन एमआयडीसी आणि हार्डेलिया कंपनीच्या व्यवस्थापकाने पाळले नाही. कुकशेत ग्रामस्थांच्या विविध समस्या आणि युवकांच्या नोकरीचा प्रश्न अजूनही सुटलेला नसल्याचा आरोप स्थानिक भूमिपुत्र आणि भाजपचे माजी नगरसेवक सुरज पाटील यांनी केला. याविरोधात गेल्या 4 दिवसांपासून हार्डलिया कंपनीसमोर बेमुदत उपोषण सुरू आहे .

1995 मध्ये हायकोर्टाने कंपनी उभारणीसाठी शेतजमिनी देणाऱ्या कुकशेत गावचे पुनर्वसन करण्याचे आदेश दिले आहेत. शेत जमिनीच्या मोबदल्यात तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासनही कंपनीने दिले. मात्र. 50 वर्ष होऊन देखील अनेक ग्रामस्थांना पूर्णतः नोकरीत समाविष्ट करुन घेतले नाही. नोकरीत समाविष्ट करुन घेतलेले ग्रामस्थ सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या वारसांना नोकरीत समावेश करून घेण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.

दुसरीकडे कंपनी प्रशासनाने कंपनीची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याचं म्हटलंय. तसेच भविष्यात नोकर भरती झाल्यास स्थानिकांना प्राधान्य देणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

कोकणावरील संकटांची मालिका सुरुच, निसर्ग चक्रीवादळानंतर अवकाळी पावसानं हापूस धोक्यात, मच्छीमारही संकटात

Farmer Protest : सलग 17 दिवस सायकल चालवत ओडिशातून गाझीपूर बॉर्डरवर, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा व्यक्ती कोण?

Western Maharashtra Rain Updates : आधी कोरोनाचं संकट, आता अवकाळ पाऊस, शेती उद्ध्वस्त, शेतकरी हतबल

व्हिडीओ पाहा :

Kukshet villagers fast for land approach Governor Bhagat Singh Koshyari

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.